Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

5 सर्वोत्‍तम आणि मोफत डाटा रिकव्‍हरी सॉफ्टवेअर जे तुमचा डाटा परत मिळवून देऊ शकतात

किरण पाटील | जुलै 29, 2014तुमच्या कॉम्प्युटरची हार्ड डिस्क हि तुमचा वैयक्तीक आणि आफिसचे documents, pictures, music आणि इतर डेटाने पुर्ण भरली असते. हा डेटा कुठे आहे ते तुम्हाला चांगले ठाऊक असते आणि हा डाटा तेथेच आहे अशी तुमची पक्की समजुत असते. पण काही वेळेस परिस्थिती वेगळी होऊ शकते, काही वेळेसाठी तुमचे लक्ष विचलीत होते आणि तुमचा डाटा अनावधानाने डिलीट होतो किंवा व्हायरस किंवा अजुन काहीतरी घडते आणि तुमचा डाटा करप्ट होतो. कारण काहीही असो, पण शेवट हा तुमचा डाटा गमावण्यात होतो.

काळजी करु नका; तुमचा डाटा परत मिळण्याची शक्यता अजून मावळली नाही. आता बरेच सॉफ्टवेअर आहेत ज्यांत, डाटा परत मिळवून देण्याची क्षमता आहे.

पण लक्षात असु दया कि, जसा तुमचा डाटा नष्ट किंवा डिलीट होतो तेव्हा हार्ड डिस्कवर कोणतेही काम करु नये तसेच इतर डाटा सेव्ह करु नये आणि कॉम्प्युटर reboot करु नये. तर लगेल पुढील पैकी एखादे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करुन डाटा परत मिळविण्याचा प्रयत्न करावा.

येथे काही मोफत असलेल्या सॉफ्टवेअरची यादी देलेली आहे जे सर्वोत्तम आहेत -


MiniTool Power Data Recovery Free Edition:

हे फाईल रिकव्हरी करण्यासाठी अतिशय सोपे सॉफ्टवेअर आहे, जे अव्यावसाईक, घरगुती वापरकर्त्यांसाठी मोफत आहे. याचा वापर करतांना तुम्हाला कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची गरज नाही, फक्त यातील रिकव्हरी स्टेप्सचे अनुसरण करा आणि तुमचा डाटा परत मिळवा. या सॉफ्टवेअरच्या मदतीने damaged, reformatted hard drive मधील डाटा सुध्दा परत मिळवता येतो. तसेच हे सॉफ्टवेअर CD, DVD disks, memory card, memory stick, आणि flash drive मधील डाटा रिकव्हरी साठी सुध्दा सपोर्ट करते.

हे सॉफ्टवेअर Windows XP, 7, 8, Vista आणि Server Operating System ला सपोर्ट करते.

पण मोफत आवृत्तीमध्ये तुम्ही फक्त 1GB पर्यंत डाटा परत मिळवू शकता.

हे सॉफ्टवेअर येथुन मोफत डाऊनलोड करता येईल.


Recuva:

Recuva हे सुध्दा अतिशय परिणामकारक असे फाईल रिकव्हरी करण्याचे मोफत सॉफ्टवेअर आहे. तुम्ही NTFS, FAT or exFAt फाईल सिस्टीम वापरत असलेल्या हार्ड डिस्क वरुन डाटा रिकव्हर करु शकता. हे वापरण्यास अतिशय सोपे आहे. यातील file recovery wizard मधील परत हव्या असलेल्या फाईलचा शोध हे त्यांचे नांव किंवा प्रकार आणि त्यांचे ठिकाण यांव्दारे मर्यादित करता येतो.

Recuva चे Deep Scan हा पर्याय वापरुन हार्ड डिस्कवर किंवा removable drives मधील खुप खोलवर साठविलेल्या फाईल परत मिळवू शकता. या पर्यायाने फाईल परत मिळवायला खुप वेळ लागतो पण याचा खुप उपयोग होतो. जर तुम्ही हार्ड डिस्क Quick Format चा पर्याय वापरुन format केली असेल तरी, Recuva हे तुमच्या फाईल परत मिळवून दयायला सक्षम आहे.

हे सॉफ्टवेअर तुम्हाला येथुन मोफत डाऊनलोड करता येईल.


EaseUS - Data Recovery Wizard Free:

EaseUS Data Recovery Wizard Free हे उत्कृष्ठ मोफत डाटा रिकव्हरी सॉफ्टवेअर आहे जे डाटा परत मिळविण्यासाठी परिणामकारक आहे. तुम्ही hard drive, external hard drive, USB drive, Memory card, digital camera, mobile phone, music player आणि इतर storage media मधील डिलीट झालेला डाटा या सॉफ्टवेअरच्या मदतीने परत मिळवू शकता. यातील user interface हा खुप सोपा आहे, यात Deleted File Recovery, Complete Recovery आणि Partition Recovery हे डाटा रिकव्हरीसाठी तीन पर्याय आहेत. Easeus Data Recovery Wizard मधील automatic mode मध्ये जलद गतीने फाईल परत मिळविता येतात. तसेच यातील रिझल्ट हे वेगळया tabbed File Preview विंडो मध्ये दिसतात. पण Easeus Data Recovery Wizard Free Edition मध्ये 1GB पर्यंतच डाटा परत मिळविता येतो.

हे सॉफ्टवेअर तुम्हाला मोफत येथुन डाऊनलोड करता येईल.


Pandora Recovery

Pandora Recovery हे अतिशय लहान आकाराचे सॉफ्टवेअर आहे, ज्याला इन्स्टॉल करण्याची गरज नाही. Pandora Recovery हे तुम्ही तुमच्या USB drive वरुन सुध्दा रन करु शकता आणि हार्ड डिस्क मधील फाईल रिकव्हर करु शकता. Pandora Recovery हा NTFS आणि FAT फाईल सिस्टमला सपोर्ट करतो. तसेच तुम्ही यात फाईलचे नांव, प्रकार, आकार आणि इतर निकष लावून शोध घेवू शकता. Pandora Recovery मध्ये फाईल (images आणि text files) रिकव्हर करण्याआधि त्यांचा preview बघता येतो.

हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करावे.


TestDisk & PhotoRec

TestDisk हे ओपन सोर्स, प्रभावी आणि मोफत डाटा रिकव्हरी सॉफ्टवेअर आहे. याचा वापर प्रामुख्याने faulty software, viruses किंवा मानवी चुकांनी झालेले lost partitions रिकव्हर करण्यासाठी आणि non-booting disks ला पुन्हा bootable करण्यासाठी होतो.

PhotoRec हे एक open source असलेले multi-platform अप्लीकेशन आहे, ज्याचा उपयोग हार्ड डिस्कमधील डिलीट झालेल्या फाईल्स, व्हिडीओ किंवा इतर डॉक्युमेंट परत मिळविण्यासाठी होतो.

हे सॉफ्टवेअर येथुन मोफत डाऊनलोड करता येते.

जर तुम्ही वरील पैकी एखादे सॉफ्टवेअर वापरुन बघीतले असेल आणि तरीही तुम्हाला हव्या त्या फाईल सापडत नसतील तर सर्व काही नष्ट झालेले नाही. तुम्ही दुसरे सॉफ्टवेअर वापरुन पुन्हा प्रयत्न करु शकता.

तुमचा अभिप्राय लिहा: