Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

सर्वोत्‍तम मोफत Download Manager जे तुमच्‍याकडे असलेच पाहिजे


इंटरनेटवरुन आज प्रत्‍येकजण शेकडो फाईल दररोज किंवा आडवडयातून कित्‍येकदा तरी डाऊनलोड करतो. यात documents, images, music, videos तसेच software जास्‍त प्रमााणात डाऊनलोड करण्‍यात येतात. या सर्व डाऊनलोडचे व्‍यवस्‍थापन करण्‍याचे काम डाऊनलोड मॅनेजर करतात. तसेच यांत नेटवर्क मधील व्‍यत्‍यय झाले किंवा इतर कारणांमूळे, मध्‍येच डाऊनलोड बंद झाले तर ते पुन्‍हा सुरु करता येते. तसेच तुम्‍ही तुमच्‍या सोईने डाऊनलोड थांबवू किंवा सुरु करु शकता तसेच त्‍यावर वेगाची मर्यादा लादू शकता.

येथे मोफत असलेल्‍या सर्वोत्‍तम डाऊनलोड मॅनेजरची यादी दिलेली आहे –

Free Download Manager

Free Download Manager हा एक उत्‍तम आणि लोकप्रिय डाऊनलोड मॅनेजर आहे. याची स्क्रिन अतिशय उत्‍साहवर्धक आहे आणि तो सर्व कामे उत्‍तम रितीने करतो. यात फाईलचे विभाजन, डाऊनलोड होणा-या फाईलचा वापर, डाऊनलोड मध्‍येच थांबले तर पुन्‍हा सुरु करण्‍याची क्षमता, torrent डाऊनलोड आणि अपलोड मॅनेजर इ. वैशिष्‍यांचा समावेश आहे. FlashGet


FlashGet

FlashGet हा सुध्‍दा विंडोज साठी एक लोकप्रिय मोफत डाऊनलोड मॅनेजर आहे. यात तुम्‍ही डाऊनलोड करीत असलेल्‍या सर्व फाईल्‍सचे व्‍यवस्‍थापन करण्‍याची सुविधा आहे. तसेच हा डाऊनलोडींगचा वेळ multithreading ने वाढवितो, डाऊनलोड साठी HTTP,FTP,BT,MMS आणि RTSP या सर्व प्रोटोकॉलचा वापर करुन उत्‍तम मार्ग शोधतो. तुम्‍ही डाऊनलोड करीत असलेल्‍या फाईल्‍स सुरक्षीत आहेत कि नाही हे तपासण्‍यासाठी तो antivirus, spyware आणि adware यांची मदत सुध्‍दा घेतो.


GetGo Download Manager

GetGo डाऊनलोड मॅनेजर हे इतर फाईल्‍स सोबतच YouTube, Facebook, Myspace, Google Video, MetaCafe, DailyMotion, iFilm/Spike, Vimeo आणि यासारख्‍या इतर वेब साईटवरील व्हिडीओ सुध्‍दा डाऊनलोड करुन देतो आणि तेसुध्‍दा एका क्लिक ने.

GetGo ला आपण इंटरनेट एक्‍सप्‍लोरर आणि फायरफॉक्‍स या वेब ब्राऊझरसोबत सुध्‍दा डाऊनलोडींगसाठी वापरु शकतो. यात मॉडर्न ग्राफिक्‍स युझर इंटरफेस आहे, तसेच आपण आपल्‍या डाऊनलोडींगचे वेळापत्रक ठरवू शकतो, डाऊनलोड मध्‍ये बंद झाले तर पुन्‍हा सुरु करु शकतो. हे Windows XP, Vista, विंडोज 7 आणि 8 या ऑपरेटींग सिस्‍टीमवर चालते.


Download Accelerator Plus(DAP)

Download Accelerator Plus हे तुमचे डाऊनलोडींग अधिक जलद गतीने होण्‍यासाठी त्‍याचे लहान भागामध्‍ये विभाजन करतो आणि एकाच वेळी अनेक मुळ स्रोत चा शोध घेऊन तेथुन डाऊनलोड करतो. यात अनेक आकर्षक वैशिष्‍टे आहेत जसे डाऊनलोड होत असतांना व्हिडीओची झलक बघू शकतो, व्हिडीओ MP3 किंवा इतर फॉरमॅट मध्‍ये रुपांतरित करू शकतो, डाऊनलोड होत असतांना या फाईल्‍स सुरक्षीत आहेत कि नाही यासाठी येथे एक सेक्‍युरीडी इंडीकेडर सुध्‍दा आहे.

तुमचा अभिप्राय लिहा: