Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

5 सर्वोत्तम CD-DVD Emulation  सॉफ्टवेअर


ब-याच वेळेला आपणांस डिव्हिडी वरील मुव्ही बघायचे असतात किंवा इतर काही अॅप्लीकेशन इन्स्टॉल करायचे असतात. तसेच काही गेम्स खेळत असतांना किंवा काही शैक्षणिक डिव्हिडी बघतांना त्यांची डिव्हिडी हि डिव्हीडी ट्रे मध्येच ठेवावी लागते. अश्या वेळी नेहमी डिव्हिडी वापरल्यामुळे त्यावर स्क्रॅचेस पडण्याची शक्यता असते. मग यावेळी आपण या डिव्हिडीचा बॅकअप घेऊन ठेवतो. या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे CD/DVD Emulation सॉफ्टवेअर चा वापर करणे.

येथे CD / DVD च्या इमेजेस फाईल व्हर्च्युअल ड्राईव्ह म्हणून वापरण्यासाठी काही सॉफ्टवेअर ची यादी दिलेली आहे –


DAEMON Tools Lite

Daemon Tools Lite हे एक मोफत टूल आहे आणि यांत एकाच वेळी 4 व्हर्च्युअल डिव्हिडी ड्राईव्ह आपण तयार करु शकतो. हे वापर करण्यासाठी अतिशय सोपे आहे. हा प्रोग्रॅम .mdx, .mds/.mdf, .iso, .b5t, .b6t, .bwt, .ccd, .cdi, .bin/.cue, .ape/.cue, .flac/.cue, .nrg, .isz या सारख्या जास्त प्रमाणांत वापरल्या जाणा-या फॉरमॅटसला सपोर्ट करतो.

तुम्ही हे सॉफ्टवेअर येथुन मोफत डाऊनलोड करु शकता.


Gizmo Drive

Gizmo Drive हे सुध्दा अतिशय चांगले व्हर्च्युअल ड्राईव्ह सिम्युलेटर आहे, जे मोफत आहे आणि यांत आपण 26 व्हर्च्युअल ड्राईव्ह वापरु शकतो. Gizmo Drive मध्ये सर्व लोकप्रिय अश्या SO, BIN, CUE या फॉरमॅट सोबत नविन VHD (virtual hard drive) या फॉरमॅटला देखील सपोर्ट करतो जे विंडोज 7 मध्ये चालते. यांत तुम्ही पासवर्ड व्दारे इमेजेस व्हर्च्युअल ड्राईव्ह मध्ये माउंट करु शकता आणि तुमच्या फाईल passphrase encrypted HD इमेजेस व्दारे सुरक्षीत ठेऊ शकता.

तुम्ही हे सॉफ्टवेअर येथुन मोफत डाऊनलोड करु शकता.


WinCDEmu

WinCDEmu हे एक ओपन सोर्स CD/DVD emulator आहे जे अमर्यादीत ड्राईव्हला सपोर्ट करतो.

WinCDEmu हे वापरण्यासाठी अतिशय सोपे आहे जे फक्त एका क्लिक ने CD/DVD mount करते. हे सॉफ्टवेअर Win32/Win64 प्लॅटफॉर्म वर चालते. तसेच ते ISO, CUE, NRG, MDS/MDF, CCD, IMG या फॉरमॅट मधील इमेजेस mount करते.

तुम्ही हे सॉफ्टवेअर येथुन मोफत डाऊनलोड करु शकता.MagicDisc / MagicISO Maker

MagicDisc ला MagicISO Maker या नावाने देखील ओळखले जाते. हे बहुते इमेज फॉरमॅट ला सपोर्ट करते यात ISO, BIN, IMA/IMG, CIF, NRG, IMG/CCD, MDF/MDS, VCD, C2D, VDI, BWI/BWT, TAO/DAO, PDI, P01/MD1/XA, VaporCD, आणि compressed Universal Image Files (UIF) यांचा समावेश होतो. यात एकाच वेळी 15 ड्राईव्ह तयार करता येतात.

तुम्ही हे सॉफ्टवेअर येथुन मोफत डाऊनलोड करु शकता.


Virtual Clone Drive

Virtual CloneDrive हे सुध्दा एक मोफत आणि वापरण्यासाठी अतिशय सोपे सॉफ्टवेअर आहे. फक्त जी इमेज mount करावयाची असेल, त्यावर डबल क्लिक करुन ती व्हर्च्युअल ड्राईव्ह मध्ये mount करता येते. हे सॉफ्टवेअर ISO, BIN, CCD या फॉरमॅट ला सपोर्ट करते आणि यात एकाच वेळी 8 व्हर्च्युअल ड्राईव्ह वारता येतात.

तुम्ही हे सॉफ्टवेअर येथुन मोफत डाऊनलोड करु शकता.

तुमचा अभिप्राय लिहा: