Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

RecuseTime – तुमच्या कॉम्प्युटर आणि इंटरनेटवरील कामांवर लक्ष ठेवा.

इंटरनेट हे माहितीने भरलेले एक प्रचंड भांडार आहे. येथे कोणत्याही विषयावर माहिती उपलब्ध आहे. पण तुम्हाला उत्पादनक्षम कार्य करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी येथे अनेक विकर्षण देखील आहेत, जे तुमचा बराच वेळ वाया घालवू शकतात.

जर तुम्ही कायम इंटरनेट वापरत असाल तर RescueTime हा प्रोग्रॅम तुमच्या साठी अतिशय उपयुक्त आहे. हा प्रोग्रॅम तुम्ही ऑनलाईन असतांना तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टींचा मागोवा घेतो आणि त्याचा एक रिपोर्ट तयार करतो. या रिपोर्ट च्या आधारे तुम्ही तुमचा वेळ कोठे आणि किती खर्च करीत आहात याविषयी संपुर्ण माहिती मिळवू शकता. RescueTime हि एक प्रकारे सेवा आहे, जी युझरला कॉम्प्युटरवर आणि इंटरनेटवर कसा आणि किती वेळ खर्च होत आहे हे समजण्यासाठी मदत करतात.

येथे तुम्हाला खुप काही वैशिष्टे मिळतील -

येथे तुम्ही कामांची विभागणी कार्यक्षम (Productive) आणि विकर्षण (distraction)अश्या दोन प्रकारात करु शकता. विकर्षण मध्ये शॉपिंग, मनोरंजन यासारखे विषय तसेच कार्यक्षम मध्ये शिकणे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सासारखे विषय देऊ शकता.

Privacy सेटींग्ज मध्ये RescueTime ने कोणत्या वेळेस तुम्ही करीत असलेल्या कामांवर लक्ष ठेवावे हे ठरवू शकतात. उदा. 24x7 किंवा एखादी ठराविक वेळ.

तुम्ही एखादया वेब साईट वर किती वेळ खर्च करावा याविषयी ध्येय ठरवू शकता आणि हा प्रोग्रॅम तुम्हाला याविषयी जाणिव करुन देईल.

हा प्रोग्रॅम तुम्हाला ily, weekly, monthly किंवा yearly रिपोर्ट बघण्यासाठी एक dashboard देतो.

हा प्रोग्रॅम background मध्ये रन होत असल्याने तुम्हाला याची जाणिव होत नाही.

तुम्हाला ई-मेल व्दारे तुमच्या कार्याची संपूर्ण माहिती पुरविली जाते, तसेच Productivity Score देखील सांगीतला जातो.

हे सॉफ्टवेअर येथुन फ्रि मध्ये मिळवा.

तसेच Android मोबाईलसाठी सुध्दा हे सॉफ्टवेअर फ्रि मध्ये येथे उपलब्ध आहे.


RescueTime च्या Prmium version मध्ये तुम्हाला आजून बरेच काही उपयुक्त वैशिष्टे मिळतील. उदा. block distracting sites, track offline activity आणि अजुन खुप काही.

हे सॉफ्टवेअर मि स्वतः वापरुन बघितले आहे आणि ते अतिशय उत्तम आणि उपयुक्त आहे. पण यात एक दोष देखील आहे आणि तो म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरवर तुम्ही करीत असलेल्या सर्व कामांची यादी तो त्यांच्या server कडे रिपोर्ट बनविण्यासाठी पाठवता. आणि म्हणून संवेदनशिल काम करीत असाल तुर यापासुन दुरच राहिलेले बरे. पण एकंदरीत हे सॉफ्टवेअर एकदम छकास आहे.


तुमचा अभिप्राय लिहा: