Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

वेब पेज मधील इमेजेस आपोआप सेव्ह करा

जर तुम्ही त्यापैकी असाल, ज्यांना इंटरनेट वरील खुप इमेजेस सेव्ह करायला आवडतात तर तुमच्यासाठी SavePictureAs हा एक खुप ऊपयुक्त टूल आहे. कारण .....

जेव्हा तुम्हाला इंटरनेटवरील एखादी इमेज सेव्ह करावयाची असेते तेव्हा तुम्ही काय करता? आपल्याला माहिती आहे ती कायमची वापरली जाणारी पारंपारीक पध्दत म्हणजे या इमेजवर right click करा - What करुन Save image as नंतर इमेज सेव्ह करण्यासाठी हवे असलेले ठिकाण शोधावे नंतर ती इमेज तेथे सेव्ह करावी. हि पध्दत खुप सोपी ? पण जर खुप इमेजेस सेव्ह करावयाच्या असतील तर ?

SavePictureAs हे एक open-source tool आहे, वरील इमेज सेव्ह करण्याची पारंपारीक प्रक्रिया खुप जलद गतीने आणि आपोआप करतो. येथे फक्त ज्या इमेजेस सेव्ह करावयाच्या इसतील त्यावर राईट क्लिक करुन आपण सेट केलेली शॉर्ट कि प्रेस करावी. आता हा प्रोग्रॅम आपोआप इमेज सेव्ह करण्याची प्रक्रिया करतो व आपण आधिच सेट करुन ठेवलेल्या फोल्डरमध्ये या इमेजेस सेव्ह करतो. जर इमेजेस चे नांव एक सारखे असेल तर तो delete one of the pictures, add the current date and time to one name किंवा तुम्हाला हवे असेलेल दुसरे नांव देण्यासाठी पर्याय पुरवितो.

तसेच, SavePictureAs मध्ये इमेजेस कोणत्या नांवाने सेव्ह करावयाच्या आहेत ते सेट करुन ठेवता येते उदा (pic1.jpg, pic2.jpg), किंवा तारीख आणि वेळेनुसार क्रमवारीत लावता येतात आणि एकसारखे नांव असेल तर “always overwrite”, “add date and time” यापैकी पर्याय निवडून ठेवता येतात.

हा प्रोग्रॅम Internet Explorer, Firefox, Chrome, Opera आणि Safari अश्या जवळपास सर्व ब्राऊझर्सला सपोर्ट करतो. तसेच प्रत्येक इमेज सेव्ह करण्याच्या ठिकाणांसाठी एक हॉट कि अश्या एकून 16 हॉट कि देता येतात.

SavePictureAs येथुन फ्रि मध्ये मिळवा.

जेव्हा तुम्ही exe फाईल ओपन करता, तेव्हा हा प्रोग्रॅम हॉट कि आणि त्यांचे डिफॉल्ड लोकेशन सेट करण्यासाठी सांगतो. तसेच नंतर हॉट कि सेट करण्यासाठी याच्या टास्कबार वरील आयकॉनवर राईट क्लिक करुन Setting मध्ये “Configure Hotkeys & Folders” या पर्यायावर क्लिक करुन देखील सेट करता येते. Ctrl+Spacebar हे एक Default key combination आहे ज्याव्दरे C:\Users\UserName\Pictures येथे इमेजेस सेव्ह होतात.

तुमचा अभिप्राय लिहा: