Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

सर्वोत्कृष्ट मोफत व्हिडीओ कन्वर्टर

आपल्याला माहितच आहे व्हिडीओ हे अनेक फॉरमॅट मध्ये आहेत जसे AVI, MOV, MPEG, FLV, MKV, MP4 ई. जे आपण वेगवेळया उपकरणांमध्ये चालवतो, उदा. कॉम्प्युटर, स्मार्ट फोन जसे आयपॅड, अॅण्ड्रॉईड, टॅब ई. पण सर्व डिव्हाईसेस हे सर्व व्हिडीओ फॉरमॅटला सपोर्ट करतील असे नाही. मग अश्या वेळेस आपणांस ते एका फॉरमॅट मधून दुस-या फॉरमॅट मध्ये रुपांतरीत करुन घ्यावे लागातात. या कामासाठी अनेक व्हिडीओ कनर्व्हर्टर उपलब्ध आहेत. यातील काही फ्रि तर काहींसाठी पैसे मोजावे लागतात.

येथे मोफत असलेले सर्वात्तम व्हिडीओ कनर्व्हर्टरची  यादी दिलेले आहे –


Freemake Video Converter :

नावाप्रमाणेच हे एक पुर्णपणे मोफत असे व्हिडीओ कनर्व्हर्टर आहे, जे लोकप्रिय असलेल्या व्हिडीओ फारमॅटस चे रुपांतरीत करण्याचे आणि त्यात बदल करण्याचे काम करते. हे 200 व्हिडीओ फॉरमॅटसला सपोर्ट करते आणि लोकप्रिय व्हिडीओ फॉरमॅट मध्ये आऊटपुट देते, फोटो आणि संगित यांना स्लाईड शो मध्ये रुपांतरीत करते, व्हिडीओ मधील काही भाग काढून टाकते, व्हिडीओ पलटवता आणि कोनात फिरवता येते, अनेक व्हिडीओची एक फाईल बनवते तसेच आऊटपुट फाईलची साईज्किती असावी हे ठरवता येते यासारखे खुप महत्वाची वैशिष्टे यात आहेत.Handbrake :

HandBrake हे एक मोफत आणि ओपन सोर्स असे व्हिडीओ कनर्व्हर्टर आहे. हे जवळपास सध्या वापरात असलेल्या प्रत्येक व्हिडीओ फॉरमॅटला सपोर्ट करते, जे कोणत्याही अॅण्ड्रॉईड किंवा इतर कोणत्याही ऑपरेटींग सिस्टमवर चालू शकते.

Format Factory :

Format Factory हे एक मोफत मल्टीमिडीया कनर्व्हर्टर आहे. या प्रोग्रॅमचा वापर करणे अतिशय सोपे आहे. यात सर्व लोकप्रिय व्हिडीओ, ऑडिओ आणि चित्रांना इतर कोणत्याही फॉरमॅट मध्ये रुपांतरीत करता येते, खराब दृष्यांना दुरुस्थ करता येते तसेच फाईलचा आकार कमी करता येतो. तसेच हा सर्व स्मार्ट फोन, आयपॅड आणि आयफोन साठी असलेल्या फॉरमॅटला सपोर्ट करतो. तसेच यात , rotate/ flip, tags, ripper DVD आणि 62 भाषा आहेत.


Free studio :

Free Studio हे एक all-in-one multimedia package bundle आहे जे DVDVideoSoft कडून तयार करण्यात आले आहे. यात YouTube programs; MP3 and Audio; CD, DVD and BD; DVD and Video; Photo and Images; Mobiles; Apple Devices; आणि 3D programs यासारखी सर्व अॅप्लीकेशन अक्सेस करता यावेत यासाठी एकूण 8 विभाग आहेत.

या मोफत असलेल्या सॉफ्टवेअर मध्ये सर्व व्हिडीओ आणि ऑडिओ फाईल्सचे रुपांतर iPod, PSP, iPhone, BlackBerry आणि इतर मोबार्इल आणि उपकरणांवर वापरता येऊ शकणा-या फॉरमॅट मध्ये करता येते. तसेच यात DVD burn आणि rip करता येतात, युटयुब वरील व्हिडीओ आणि संगीत तुमच्या कॉम्प्युटरमध्ये डाऊनलोड करता येते, व्हिडीओ आणि ऑडिओ मध्ये बदल करता येतो, व्हिडीओ रेकॉर्ड करता येतात तसेच 3D व्हिडीओ आणि प्रतिमा तयार करता येतात.


तुमचा अभिप्राय लिहा: