Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

Image Resizer – फक्त एका राईट क्लिकने कोणतीही इमेज रिसाइज करा

मे 25, 2015तुम्हाला तुमचे फोटो किंवा सेल्फी सोशल नेटवर्कींग साईटवर शेअर करावयाचे आहे का? पण जर हे फोटो एखादया हाय रिझोल्यूशन कॅमेरा किंवा मोबाईल मधून घेतले असतील तर त्यांचा आकार खुप जास्त असल्याने अपलोड होण्यास बराच वेळ लागतो.पण आता इमेजचा आकार बदलण्यासाठी तुम्हाला फोटोशॉप किंवा इतर सॉफ्टवेअरचे ज्ञान घेण्याची आवश्यक्ता नाही. तुम्ही विंडोज एक्सप्लोरर मध्ये इमेजवर राइट क्लिक करून त्यांचा आकार बदलवू शकता.

Image Resizer हा सर्वात वापरण्यास सोपा आणि फ्री टूल आहे, ज्यात तुम्ही सहजपणे आणि जलदगतीने कोणत्याही इमेजची साइज हवी तेवढी बदलवू शकता. येथे इमेजसाठी डीफॉल्ट साइज व तुम्हाला हवी ती कस्टम साइज असे दोन पर्याय आहेत.

जर तुम्हाला हि रिसाइज केलेली इमेज दूस-या फोल्डर मध्ये ठेवायची असेल तर, या इमेजवर राइट क्लिक करून दूस-या फोल्डर मध्ये ड्रॅग करा. येथे इमेज रिसाइजचा मेनू दिसेल, येथून हवा तो पर्याय निवडा.हे टूल bmp, dib, gif, ico, jpe, jpeg, jpg, png, tif, tiff आणि wdp सह विविध फॉर्मेटला सपोर्ट करते.

डाउनलोड: Image Resizer

तुमचा अभिप्राय लिहा: