Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

या सर्वोत्तम फ्री अनइन्‍स्‍टॉल सॉफ्टवेअरचा वापर करुन कोणताही प्रोग्राम सुरक्षितपणे आणि पुर्णपणे रिमूव्‍ह करा

मार्च 07, 2015विंडोज मध्ये इनबिल्ट Add/Remove Programs चे फिचर्स आहे, पण हे तुमच्या सिस्टिमवर परिणाम करणा-या फ्रॅगमेंटस आणि रजिष्ट्री एंट्रीज मागे ठेऊन एखादा प्रोग्राम पुर्णपणे अनइन्स्टॉल करु शकत नाही. म्हणूनच एखादा प्रोग्राम पूर्णपणे काढून टाकण्यासाठी तुम्हाला अधिक शक्तिशाली थर्ड-पार्टी टूलची आवश्यक्ता आहे. या फ्री अनइन्स्टॉलर सॉफ्टवेअरमध्ये अनेक वैशिष्टयांचा समावेश आहे जसे एखादे सॉफ्टवेअर पूर्णपणे आणि सुरक्षितपणे काढून टाकणे, टेम्पररी फाइल्स आणि रजिष्ट्री एंट्रीज काढून टाकणे, बल्क अनइस्टॉल इ.विंडोज अनइस्टॉलरचे अनेक निवड करण्यासारखे प्रोग्राम आहेत, चला त्यातील काही सर्वोत्तमवर एक नजर टाकूया ......


1) Advanced Uninstaller Pro:

हे शक्तिशाली मोफत टूल कायमस्वरुपी संवेदनशील फाईल डिलिट करणे, रजिष्ट्री क्लिन करणे, सिस्टिम ऑप्टीमाइज, रजिष्ट्री आणि विंडोज कोर फाइलचा बॅकअप तसचे अनावश्यक सॉफ्टवेअर काढून टाकणे असे अनेक पर्याय पुरवतो.

Advanced Uninstaller Pro हा विंडोजसाठी एक प्रगत अनइन्स्टॉलर आहे. याच्या सोप्या आणि अंतर्ज्ञानी इंटरफेसचा वापर करून तुम्ही एखादा प्रोग्राम जलद आणि पुर्णपणे काढून टाकू शकता. यातील समाविष्ट इन्स्टॉलर मॉनिटर मध्ये तुम्ही तुमच्या कॉम्प्यूटरमध्ये एखादा प्रोग्राम इन्स्टॉल करत असतांनाचा सर्व घटनाक्रमांची नोंद होते. हे सर्व बदल Advanced Uninstaller Pro लक्षात ठेवतो जेणेकरून जेव्हा तुम्ही या प्रोग्रामला अनइन्स्टॉल कराला त्यावेळी तो पुर्णपणे काढून टाकू शकेल.

डाउनलोड: Advanced Uninstaller Pro2) Revo Uninstaller:

Revo Uninstaller हे सुध्दा सर्वात लोकप्रिय अनइस्टॉलर मधील एक आहे. यातील अनइस्टॉलर टूल वर्तमान आणि सर्व युझरसाठी इनस्टॉल प्रोग्रामची आणि कंपोनंटची यादी बनवतो. प्रोग्रामचे रेग्युलर अनइन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही अतिरिक्त अनावश्यक फाइल्स, फोल्डर्स, सर्विसेस, ड्रायव्हर्स, शेल एक्सटेंशन आणि रजिष्ट्री किज काढून टाकू शकता, जे प्रोग्राम काढून टाकल्यानंतर पीसीवरच राहून जातात.

डाउनलोड करा: Revo Uninstaller


3) IObit Uninstaller:

IObit Uninstaller तुमच्या पीसी वरील कोणतेही सॉफ्टवेअर पूर्णपणे आणि सुरक्षितपणे अनइन्स्टॉल करतो. तसेच तो या सॉफ्टवेअरच्या मागे राहिलेल्या फाइल्स आणि फोल्डर्स शोधून डिलीट करतो. यात त्रासदायक वेब ब्राउझर टूलबार्स आणि प्लग-इन काढून टाकण्याची क्षमता आहे. यात फोर्स अनइन्स्टॉल चे वैशिष्टय सुध्दा आहे, ज्याव्दारे जेव्हा एखादे सॉफ्टवेअर पारंपारिक रीतीने काढून टाकण्यात असमर्थ हातो, तेव्हा हा या अॅप्लीकेशनला डिलीट करू शकतो. IObit Uninstaller च्या मोफत आवृत्तीमध्ये तुम्ही फक्त प्रोग्राम्स एक-एक करून किंवा बॅच मध्ये फक्त रिमूव्ह करू शकत नाही तर या प्रोगाम्सच्या मागे राहिलेल्या फाइल्स आणि फोल्डर्स सुध्दा सहज काढून टाकू शकता.

डाउनलोड: IObit Uninstaller


4) Wise Program Uninstaller:

Wise Program Uninstaller हा एक आश्चर्यकारक अनइन्स्टॉलर प्रोग्राम आहे, जो कोणताही प्रोग्राम त्याच्या कोणत्याही फाइल्स्आणि फोल्डर्स मागे न ठेवता पुर्णपणे अनइन्स्टॉल करू शकतो. याचा इंटरफेस अतिशय क्लिन आणि अंतर्ज्ञानी आहे, जो तुमच्या पीसीवर किती प्रोग्राम इन्स्टॉल आहेत आणि त्यांनी हार्ड डिस्कवर किती जागा व्यापली आहे याविषयी सर्व संबंधीत माहिती दाखवतो.

Wise Program Uninstaller मध्ये दोन अनइन्स्टॉल मोड आहेत – सेफ आणि फोर्स्ड. सेफ मोर्ड मध्ये प्रोग्रामला सामान्य परिस्थितीमध्ये अनइन्स्टॉल केले जाते, यात ऑपरेटींग सिस्टिम फेल होण्याचा कोणताही धोका न पत्करता या प्रोग्रामशी संबंधीत सर्व डाटा काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. तर फोर्स्ड अनइन्स्टॉल मोड मध्ये युझर हा प्रोग्राम काढून टाकण्यासाठी ब्रुट फोर्स चा वापर करतो, यात या प्रोग्रामशी संबंधीत हार्ड ड्राइव्हवर मागे राहिलेल्या सर्व फाइल्स आणि रजिष्ट्री एंट्रीज काढून टाकल्या जातात.

डाउनलोड: Wise Program Uninstallerतुमचा अभिप्राय लिहा: