Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

विंडोज साठी सर्वोत्तम आणि मोफत स्क्रीन कॅप्चर आणि रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर

किरण पाटील | जानेवारी 22, 2015जर तुम्ही तुमच्या कल्पनांचा किंवा ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी व्हिडिओ करु इच्छिता, तर स्क्रीन रेकॉर्डिंग तुमच्यासाठी एक उत्तम उपाय ठरु शकतो. येथे काही अतिशय उपयुक्त असे फ्री स्क्रीन रेकार्डिंग सॉफ्टवेअरची यादी आहे, ज्यात तुम्ही ई-लर्निंग साहित्य, माहितीपुस्तिका, सादरीकरणे, स्क्रीनकास्ट तयार करु शकतात. तसेच यात प्रशिक्षण, शिक्षण, व्यवसायीक सादरीकरणे सुध्दा तयार करु शकता.1) TinyTake:

TinyTake हे MangoApps कडून विकसीत केलेले पुर्णपणे फ्री स्क्रीन कॅप्चर सॉफ्टवेअर आहे, ज्यात डेस्कटॉपवरील स्क्रीनशॉट घेणे आणि कोणत्याही अॅक्टीव्हिटीचा व्हिडिओ रेकॉर्ड बनवणे शक्य आहे. तुम्ही हे व्हिडिओ लोकल पीसी मध्ये स्टोअर करु शकता किंवा शेअर करु शकता. हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर, तुमच्या वैध ई-मेल अॅड्रेस सह यात रजिष्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

TinyTake मध्ये अतिशय आकर्षक आणि आधुनिक इंटरफेस आहे, ज्यात तुम्ही व्हिडिओ अपलोड किंवा शेअर करण्यापुर्वी कस्टमाइज करु शकता. यात तुम्ही व्हिडिओमध्ये अनेक आकार टाकू शकता, क्रॉप करु शकता तसेच टेक्स्ट टाकू शकता. TinyTake मध्ये तुम्ही 120 मिनिटापर्यंतचा व्हिडिओ रेकॉर्ड करु शकता.

TinyTake हे विंडोज XP, विंडोज 7 किंवा विंडोज 8 ला सपोर्ट करते आणि यासाठी किमान रॅम 4GB असणे आवश्यक आहे.

पण TinyTake मध्ये तयार केलेल्या व्हिडीओ मध्ये याचा वॉटरमार्क काही सेकंद दिसतो.

डाउनलोड: TinyTake


2) ActivePresenter:

Atomi system ने तयार केलेले ActivePresenter ऑनस्क्रीनचे व्हिडिओ आणि इमेजेस सहज आणि जलद गतिने तयार करतो. ActivePresenter पुर्णपणे मोफत आहे आणि ते free, standard आणि professional आवृत्तीत उपलब्ध आहे. मोफत आवृत्तीत कोणत्याही वॉटरमार्क शिवाय आणि वेळेच्या बंधनाशिवाय WMV, AVI, MPEG4 आणि WebM या फॉरमॅट मध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करता येतात.

ActivePresenter मध्ये अनेक शक्तिशाली वैशिष्टये आहेत, जसे व्हिडिओ कट, क्रॉप, डिलीट, जॉइंट, व्हॉल्यूम कमी जास्त करणे इ. तसेच तुम्ही व्हिडिओ मध्ये अनेक आकार, झूम-एन-पॅन इफेक्ट, कर्सर पाथ आणि कॅप्शन टाकू शकता. जेव्हा तुम्ही नविन प्रोजेक्ट सुरु करता, तेव्हा येथे निवडीसाठी चार प्रोफाइल आहेत.

डाउनलोड: ActivePresenter


3) SRecorder:

SRecorder हा वापरण्यास अतिशय सोपा आणि युझर फ्रेंडली आहे, जो तुम्हाला जलद गतीने आणि सोप्या पध्दतीने स्क्रीनवरील कोणत्याही भागातील अॅक्टीव्हीटी रेकॉर्ड करण्यासाठी मदत करतो. यात तुम्ही आवाजासह किंवा आवाजा शिवाय पुर्ण स्क्रीनवरील किंवा तुमच्या पसंतीच्या भागातील अॅक्टीव्हीटी रेकॉर्ड करू शकता. तुम्ही हे व्हिडीओ तुमच्या लोकल कॉम्प्यूटरवर mp4 फॉरमॅट मध्ये सेव्ह करु शकता.

रेकॉर्डिंगच्या वैशिष्ट्यासोबत Srecorder मध्ये हिस्ट्री चा लॉग आहे. हिस्ट्री लॉग मध्ये तुम्ही अपलोड केलेले रेकॉर्डिंग Srecorder च्या अॅड्रेस वर वेब ब्राउझर मध्ये पाहू शकता.

Srecorder हे विंडोज XP, Vista, विंडोज 7 आणि 8 ला सपोर्ट करतो.

डाउनलोड: SRecorder


4) CamStudio:

CamStudio स्क्रीनवरील सर्व व्हिडीओ आणि ऑडीओ अॅक्टीव्हीटी रेकॉर्ड करण्यासाठी हा एक ग्रेट टूल आहे. हा रेकॉर्डिंग व्हिडीओच्या AVI फाईल बनवतो आणि तुम्ही त्यांना फ्लॅश फॉरमॅट मध्ये रूपांतरित करू शकता. तसेच यात व्हिडिओ आउटपुट मध्ये कमेंट्स, कॅप्शन आणि टाइमस्टँप टाकू शकता. या छोटया प्रोग्रॉम सोबत तुम्ही कोणत्याही सॉफ्टवेअरचा व्हिडीओ डेमो बनवू शकता.

तुमच्या व्हिडीओच्या आऊटपूट वर तुमचे पुर्ण नियंत्रण राहते. तुम्ही यात कर्सरला कस्टमाईज करू शकता. पूर्ण स्क्रीन किंवा त्याचा एखादा भाग रेकॉर्ड करू शकता, तसेच रेकॉर्डींगची क्वालीटी कमी-जास्त करू शकता.

डाउनलोड: CamStudio


5) Icecream:

Icecream Screen Recorder हा एक मोफत टूल आहे, जो सक्रीनवरील कुठल्याही एरियाचा स्क्रीनशॉट किंवा व्हिडीओ फाईल बनवू शकता. Icecream Screen Recorder हा आवाजासह तसेच मायक्रोफोन ऑडीओसह कोणतीही स्क्रीन कॅप्चर टास्क हाताळू शकतो. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तो क्लिपबोर्ड वर सेव्ह करू शकता किंवा इमेज फाइल म्हणून सेव्ह करू शकता किंवा युआरएलवर अपलोड करू शकता.

हे सॉफ्टवेअर वापरण्यास अतिशय सोपे आहे, तसेच यात प्रेाफेशनल स्क्रीन कॅप्चरींगसाठी टूल्स आणि ऑप्शनचा पूर्ण सेट आहे. यात तुम्ही वेबिनार, गेम्स आणि स्काइपी एचडी क्वालीटी मध्ये रेकॉर्ड करू शकता. Icecream मध्ये ठराविक दिवस आणि वेळवर रेकॉर्डिंग सुरू होण्यासाठी आणि बंद होण्यासाठी स्क्रीन कॅप्चर सेशन शेड्यूल करु शकता. तसेच यातील सेटींग पॅनलमधून माउस कर्सर दाखवू किंवा लपवू शकता.

डाउनलोड: Icecream


तुमचा अभिप्राय लिहा: