Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

WinHotKey सोबत कोणत्‍याही अॅप्‍लीकेशन किंवा फोल्‍डरसाठी तुमचा स्‍वतःचा शॉर्टकट तयार करा

किरण पाटील | सप्‍टेंबर 20, 2014तुम्हाला कॉम्प्युटरवर काम करतांना ब-याच वेळा अनेक डॉक्युमेंट, फोल्डर किंवा keyboardकाही अॅप्लीकेशन हे पुन्हा पुन्हा लागत असतात. मग अश्या वेळी प्रत्येक वेळेस ते ओपन करतांना खुप वेळ तसेच मेहनत लागते जो तुम्ही यासाठी एक शॉटकट कि ठरवून वाचवू शकता. तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे हव्या त्या फाईल, फोल्डर किंवा अॅप्लीकेशनला hotkey ठरवू शकता, जेणेकरुन कमी परिश्रमात ते सहज ओपन करता येतील.

तुम्ही “WinHotKey” हे एक मोफत असलेले उपयुक्त अॅप्लीकेशन वापरुन बघू शकता. यासाठी हे अॅप्लीकेशन Sofpedia वरुन मोफत डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


WinHotKey हे एक लहान पण अतिशय शक्तीशाली टूल आहे जे जागतिक स्तरावर तुम्ही hotkeys ठरविण्यासाठी वापरु शकता. याचा आकार हा फक्त 826MB एकवढा आहे आणि ते 32 तसेच 64 बिट ऑपरेटींग सिस्टीमवर चालते.

हे अॅप्लीकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला येथे आधीच तयार असलेल्या काही hotkeys ची यादी येथे दिसेल.

नविन hotkey तयार करण्यासाठी -


विंडोज ऑपरेटींग सिस्टीम मध्ये hotkey तयार करण्याचे वैशिष्टयाचा समावेश आहे. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा. “तुमच्या आवडत्या अॅप्लीकेशन किंवा फोल्डरसाठी Hotkey असे तयार करावे

तुमचा अभिप्राय लिहा: