Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

सॉफ्टवेअरची माहिती

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

5 सर्वोत्‍तम Disk Defragmentation Tools जे तुमच्‍या सिस्‍टीमची कार्यक्षमता वाढवतात

किरण पाटील | ऑगस्‍ट 09, 2014हार्ड डिस्क Defragmenting करणे हा सिस्टीमचे मेंटेनंन्स करण्याचा एक अविभाज्य भाग आहे. Defragmenting मुळे तुमच्या हार्ड मधील फाईल्स अॅक्सेस जलद गतीने होतो. विंडोजच्या सर्व व्हर्जनमध्ये हे वैशिष्ट समाविष्ट केलेले असते. पण या वैशिष्टयाला काही मर्यादा आहेत आणि जर तुम्हाला अतिशय जलद गतीचा, अधिक वैशिष्टे असलेला आणि तपशीलवार आकडेवारी देणारा प्रोग्रॅम हवा असेल तर तो पुढील पैकी एक आहे -


1) UltraDefrag:

UltraDefrag हे एक ओपन सोर्स विंडोज साठीचे disk defragmenter आहे. याचा इंटरफेस अतिशय साधा आहे. हा विश्वसनियरित्या, जलदगतीने आणि शक्य तितका सर्वोत्कृष्ट परिणाम देतो. तसेच काम करीत असतांनासुध्दा तो बॅकग्राउंडमध्ये काम करु शकतो.

UltraDefrag मध्ये एकाच वेळी अनेक ड्राईव्ह defragment करता येतात. पण त्यासाठी एकापेक्षा जास्त या प्राग्रॅमच्या विंडो ओपन कराव्या लागतात. हा Windows NT 4.0, Windows 2000, Windows XP, Vista, Windows 7 आणि 8 मध्ये चालू शकतो. तसेच हा 32bit आणि 64bit ला देखील सपोर्ट करतो.

डाउनलोड : UltraDefrag2) Smart Defrag 3:

Smart Defrag 3 हे एक मोफत, कमी आकाराचा आणि स्थिर disk defragment tool आहे, ज्याची रचना हार्ड डिस्कची जास्तीत जास्त कार्यक्षमता वाढविण्यासाठी केली आहे. Smart Defrag हा आपोआप काम करतो आणि तुमच्या कॉम्प्युटरमध्ये काम चालू असतांनासुध्दा तो बॅकग्राउंडमध्ये शांतपणे काम करु शकतो.

तसेच तो अतिशय बौद्धिकपणे तुमच्या कॉम्प्युटरमधील सर्व फाईल्स त्यांच्या वापरानुसार रचून देतो, आणि अश्या प्रकारे डिस्कची गती वाढवतो जेणे करुन जेणे करुन तुम्ही जदल गतीने डाटा अॅक्सेस करु शकाल. यातील Deep Analyze या तंत्रज्ञानाव्दारे, हा defragmentation करण्याआधी हुशारीने जंक फाईल्स नष्ट करतो आणि तुमच्यासाठी अधिक डिस्क मधील जागा मिळवून देतो. हा Windows 8 आणि 8.1 साठी पुर्णपणे सपोर्ट करतो.

डाउनलोड : Smart Defrag 3


3) Defraggler:

Defraggler हे Piriform कडून मोफत defragment software आहे.

हे वापरण्यास अतिशय सोपे आहे, फक्त जो ड्राईव्ह तुम्हाला defragment करावयाचा आहे तो सिलेक्ट करा आणि नंतर नंतर Defrag बटनावर क्लिक करा. जर तुम्हाला कमी वेळात Defrag करावयाचे असेल तर येथे Quick Defrag चा पर्याय देखील उपलब्ध आहे. Defraggler मध्ये तुम्ही एक किंवा अधिक फाईल किंवा फोल्डर, संपूर्ण हार्ड ड्राईव्ह defragment करु शकता. Defraggler चे सर्वात प्रगत वैशिष्टय म्हणजे यात मोठया फाईल्स हार्ड ड्राईव्हच्या शेवटी पाठविण्याची क्षमता आहे. तसेच तो हार्ड डिस्कमधील जागा कश्या रितीने भरली आहे आणि रिकामी आहे हे तो interactive ड्राईव्हच्या नकाश्यामध्ये दाखवतो.

डाउनलोड : Defraggler


4) MyDefrag:

MyDefrag हा एक अतिशय शक्तीशाली प्रोग्रॅम आहे जो इतरांपेक्षा उजवा ठरु शकतो. यातील इंटरफेस हे अतिशय साधे आहे. हा जदल गतीने सुरु होतो, वापरण्यास सोपा आहे आणि अतिशय कमी आकाराचा आहे. यात दररोज, मासिक, साप्ताहिक असे defragmentation करण्याच्या तीन प्रोफाईल समाविष्ट कलेल्या आहे. MyDefrag हा USB Pen Drive, flash memory card आणि solid state drives यांना सुध्दा defragmentation करण्याची सुविधा देतो.

MyDefrag हा Windows 2000, 2003, XP, Vista, 2008, Win7, आणि X64 चे disk defragmenter करतो आणि त्यांची कार्यक्षमता वाढवतो.

डाउनलोड : MyDefrag


5) Auslogics Disk Defrag:

Auslogic DIsk Degfrag हे साध्या disk defragmentationis पेक्षा अजून काहीतरी जास्त आहे. हा हार्ड डिस्कवरील फाईल्स अतिशय जलद गतीने defragment करतो, फाईल ठेवण्याच्या ठिकाणांचा जलद गतीने नियोजन करतो आणि हार्ड डिस्कवरील मोकळी जागा संकलीत करतो, जेणेकरुन शक्य तीतका डाटा अॅक्सेसचा वेग अनेक पटीने वाढेल. हा एकाच फाईलला किंवा फोल्डरला defragmentation करण्याचा पर्याय पुरवितो, डिस्क मधील त्रुटींची तपासणी करतो आणि त्यांची दुरुस्ती करतो. तुम्ही या प्रोग्रॅमला जेव्हा कॉम्प्युटरमध्ये कोणतेही काम होत नसेल तेव्हा fragmentation करण्यासाठी auto-defrag वर ठेवू शकता.

जेव्हा तुम्ही हा प्रोग्रॅम सुर करता, तेव्हा तो आपोआप कॉम्प्युटरमधील सर्व hard drive partitions शोधतो, जलद गतीने विश्लेषण सादर करतो आणि आलेला रिझल्ट cluster map च्या स्वरुपात दाखवतो. नंतर जो ड्राईव्ह Defrag करावयाचा आहे तो सिलेक्ट करुन Defrag बटनावर क्लिक करावे. चालू असलेले defragmentation कोणत्याही क्षमी थांबवता येते.

डाउनलोड : Auslogics Disk Defrag

तुमचा अभिप्राय लिहा: