सॉफ्टवेअर टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

Computer Knowledge in Hindi

http://www.itkhoj.com/computer-knowledge-hindi/

क्वीक फिक्स टिप्स्जे तुमच्या कॉम्प्यूटरची गति वाढवू शकतील

एप्रिल 15, 2015

माऊसच्या राइट क्लिक बटनाचा उपयोग हा नेहMouse_powerमी contextual मेनू ओपन करण्यासाठी केला जातो, जो एक पॉप-अप मेनू आहे आणि जो तुम्ही कोठे क्लिक करीत आहात यावर अवलंबून असतो. कॉन्टेक्स्ट मेनू (ज्याला कॉन्टेक्स्टयूअल किंवा पॉप-अप असे देखील म्हणतात) हा graphical user interface (GUI) आहे जो युझरच्या इंटरॅक्शनवर प्रकट होतो, जसे की माऊसचे राइट क्लिक ऑपरेशन. उदा. जेव्हा तुम्ही Recycle Bin वर राइट क्लिक करता तेव्हा येथे open it, empty it, delete it, आणि properties असे ऑप्शन येतात.

अनेक युझर्सना राइट क्लिकच्या सर्व पध्दती ज्यामूळे तुमचे कॉम्प्यूटरवरचे काम अधिक सोपे होते, त्या  विषयी कदाचित माहिती नसेल. या टिप्स तुम्हाला राइट क्लिक वापरून कार्ये करतांना वेळेची बचत कशी करायची  यासाठी मदत करतील.


Right-click drag-and-drop:

ऑब्जेक्टस् मूव्ह किंवा कॉपी करण्यासाठी, बरेच युझर्स हे लेफ्ट क्लिकचा वापर करतात. पण राइट क्लिक करून देखील बॉब्जेक्ट ड्रॅग आणि ड्रॉप करू शकतात, तसेच हे जास्त व्हर्सटाइल आहे.


Expanded context menu with shift and right-click:

जर तुम्ही राइट क्लिक करते वेळी Shift कि होल्ड करून ठेवली, तर हि अॅक्शन अजून काही आयटेम कान्टेक्स्ट मेनू मध्ये अॅड करेल. पुढे याचे काही उदाहरणे आहेत -

Desktop/Windows Explorer Context Menu – Open command windows here.

File Context Menu – Run as different user and Copy as Path.

File or Folder "Send To" Context Menu – राइट क्लिकच्या Send To मध्ये बरेच आयटम अॅड होतात.


Right Click context menu:

राइट क्लिक मेनू मध्ये खालील महत्वपूर्ण पर्याय आहेत –


Printing:

तुम्ही एखादी फाइल ओपन न करता देखील प्रिंट करू शकता. यासाठी त्या फाइलच्या आयकॉनवर राइट क्लिक करा आणि Print हा पर्याय सिलेक्ट करा. आता ती फाइल आपोआप ओपन होइल, प्रिंट कमांड दिली जाईल आणि नंतर आपोआप बंद होईल.


Send to:

येथे अनेक मार्ग आहे, जे अतिशय उपयुक्त असे Send to फंक्श्नला तुमच्यासाठी अजून कार्यक्षमतेने काम करण्यास भाग पाडेल. विंडोज मधील Send to मेनू हा तुम्हाला फाइल किंवा फोल्डर विविध ठिकाणी पाठविण्यासाठी मदत करतो. जर तुम्हाला काही फाइल्स किंवा फोल्डर नियमितपणे एका विशिष्ट फोल्डर मध्ये पाठवावे लागत असेल तर, हा फोल्डर तुम्ही Send to मेनू मध्ये अॅड करू शकता.

Send to मेनू मध्ये एखादा आयटम अॅड, इडिट किंवा रिमूव्ह करण्यासाठी -तुमच्या पीसीच्या एक्सप्लोरर मध्ये खालील अॅड्रेस कॉपी करा

C:\Users\username\AppData\Roaming\Microsoft\Windows\SendTo (येथे username च्या जागी तुमचे username घ्या)


येथे काही ग्रेट थर्ड पार्टी टूल आहेत, ते राइट क्लिक मेनूची पॉवर अनेक पटीने वाढवतील -


Right Click Context Menu Extender

Right-Click Extender हा तुम्हाला Drive, File, Folder, Computer आणि Desktop चे अतिरिक्त ऑप्शन्स अॅड करण्यास किंवा रिमूव्ह करण्यास परवानगी देतो. तसेच हा वैयक्तीक कामांसाठी वापरण्यास पूर्णपणे मोफत आहे.

हा एक पोर्टेबल प्रोग्राम आहे, जो इन्स्टॉल करण्याची आवश्यक्ता नाही. फक्त डाऊनलोड करा आणि रन करा. या युटिलीटी मध्ये चार हेडिंग्ज आहेत - File/Folder, Desktop, Drives, आणि MyComputer. तसचे या प्रत्येक हेडिंग्ज साठी त्यांचे राइट क्लिक ऑप्शन अॅड किंवा रिमूव्ह करण्यासाठी येथे उपलब्ध आहेत.

डाउनलोड: उजव्या : Right Click Context Menu Extenderतुमचा अभिप्राय लिहा: