सॉफ्टवेअर टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

Computer Knowledge in Hindi

http://www.itkhoj.com/computer-knowledge-hindi/

क्वीक फिक्स टिप्स्जे तुमच्या कॉम्प्यूटरची गति वाढवू शकतील

किरण पाटील | जानेवारी 09, 2015

ती वेळ आठवा जेव्हा तुम्ही नविन कॉम्प्यूटर विकत घेतला होता, तेव्हा तो त्याचा सर्वोत्तम परफॉर्ममन्स्देत होता. पण कालांतराने, पीसी ची गती कमी होऊ शकते. बूट होण्यासाठी खुप वेळ लागणे, युझरच्या अॅक्शनला प्रतिसाद देण्यासाठी अधिक वेळ घेणे अश्या लक्षणांवरुन पीसी ची वेग कमी झाल्याचे दिसून येते. तथापि, तुम्ही तुमच्या पीसीची गती वाढविण्यासाठी काही गोष्टी करु शकता.खाली काही सोप्या टिप्स्दिलेल्या आहेत, ज्याव्दारे तुम्ही तुमच्या पीसी ची गती आणि त्याचा परफॉर्मन्स्सुधारु शकता –


1) अनावश्यक प्रोग्रॅम काढून टाका:

जर तुम्ही खुप प्रोग्रॅम्स पीसी वर इन्स्टॉल केलेले असतील तर पीसीचा वेग कमी होतो. यावर उत्तम उपाय म्हणजे नको असलेले प्रोग्रॉम काढून टाकणे.

हे करण्यासाठी -


2) startup मधील प्रोगॅमची संख्या मर्यादित ठेवा:

जर तुमचा कॉम्प्यूटरला सूरू होण्यासाठी बराच वेळ लागत असेल तर सर्वात आधि करावयाची गोष्ट म्हणजे पीसी मधील स्टार्टअप यादी तपासा. कारण जेव्हा पीसी सुरु होतो तेव्हा जितके जास्त प्रोग्रॅम स्टार्टअप मध्ये असतील तितका जास्त वेळ पीसी सुरू होण्यासाठी लागेल, कारण हे प्रोगॅम पीसी सुरू होतांना आपोआप रन होतात.

स्टार्टअप मधून अनावश्यक आयटम दूर करण्यासाठी -


3) डिस्क क्लिनअप:

Disk Cleanup हि युटिलीटी हार्ड डिस्क मधील डिस्कवर अनावश्यक किंवा तात्पुरत्या फाइल्स डिलिट करते.

Start ला क्लिक करा – सर्च बॉक्स मध्ये Disk Cleanup टाईप करा आणि Enter करा.Drives list मधून हवा तो ड्राईव्ह सिलेक्ट करा आणि Ok ला क्लिक करा.येथून हवा तो फाइलचा प्रकार सिलेक्ट करा आणि Ok ला क्लिक करा.


4) टेम्पररी फाइल्स डिलीट करा:

जेव्हा एखादा प्रोगॅम कॉम्प्यूटरवर रन होतो तेव्हा तो अनेक टेम्पररी फाइल्स तयार करतो, ज्यांचा परिणाम कॉम्प्यूटरच्या वेगावर होतो. Start बटनावर क्लिक करा आणि सर्च बॉक्स मध्ये Run टाईप करा.येथे %temp% टाईप करा आणि Enter करा.Ctrl + A प्रेस करुन सिलेक्ट ऑल करा आणि डिलीट करा.


5) व्हायरस आणि मालवेअर साठी स्कॅन करा:

तुम्ही नियमितपणे तुमच्या पीसीचा परफॉर्मन्सवर परिणाम करणारे व्हायरस आणि मालवेअर साठी  स्कॅन केले पाहिजे. यासाठी तुमच्या अॅन्टीव्हायरस मध्ये weekly स्कॅन करण्याचा पर्याय निवडा. तसेच पीसी मध्ये एका पेक्षा जास्त अँटीव्हायरस तर नाहित याची खात्री करा, कारण ते पीसीचा वेग कमी करतात.


6) हार्ड ड्राइव्हला डिफ्रॅगमेंट करा:

जेव्हा हार्ड डिस्कवर अधिक माहिती भरली जाते तेव्हा, दुसरा डेटा सेव्ह करण्यासाठी तुम्ही यातील काही डेटा डिलीट करतात आणि या रिक्त जाता सर्व डिस्कच्या पृष्ठभागावर विखुरल्या जातात. याचा परिणाम पीसीला फाइल्स अॅक्सेस करण्यासाधी अधिक वेळ लागतो व परिणामी पीसीचा वेग मंदावतो.

हार्ड ड्राइव्ह डिफ्रॅगमेंट करणे हा सिस्टीम मेंटेनंन्सचा एक महत्वपूर्ण भाग आहे. डिफ्रॅगमेंटने डिस्कवरील सर्व डेटा व्यवस्थित रचला जातो व फाईल्सचा अॅक्सेस टाईम वाढतो. विंडोजच्या सर्व आवृत्तीमध्ये मुलभूतरित्या हे वैशिष्ट्य इनबिल्ट आहे.


डिफ्रॅगमेंट बद्दल अधिक माहितीसाठी मागील पोस्ट पहा - Disk Fragments म्हणजे काय? Disk Fragments कसे काम करते?


7) ब्राउझर क्लिन करा:

जर तुमचा ब्राउझर स्लो चालत असेल तर मग तुम्ही त्यातील टेम्पररी फाइल्स, कॅशे आणि कुकीज डिलीट करुन क्लिक करा. ही कृती प्रत्येक ब्राउझर मध्ये वेगळी आहे. तसेच एखादे अॅडऑन किंवा टूलबार यासोबत इनस्टॉल तर झाला नाही हे तपासा आणि तसे काही आढळले तर त्वरीत काढून टाका.तसेच इंटरनेट गती वाढविण्यासाठी IE पेक्षा Chrome वापरण्याचा करण्याचा विचार.


8) व्हिज्युअल इफेक्ट समायोजित करा:

विंडोज मध्ये अॅनिमेटेड विंडोज आणि फेडिंग मेनूसह अनेक जबरदस्त आकर्षक इफेक्ट आहेत. परंतु जर तुम्हाला अधिक वेगाची गरज असेल तर हे व्हिज्युअल इफेक्ट कमी करा. Start बटनाला क्लिक करा आणि सर्च बॉक्स मध्ये Performance Information and Tools टाईप करुन Enter करा. Adjust visual effects ला क्लिक करा.येथे विंडोजच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी योग्य ते पर्याय निवडा.


9) वरील काही पद्धती काही मिनटात करा:

जर तुम्ही कॉम्प्यूटर एक्सपर्ट नसाल आणि वरील सर्व कृती झटपट करु इच्छित असाल तर मागील पोस्ट पहा - कॉम्प्युटरचा स्पिड एका क्लिक ने कसा वाढवता येईल ?

कोणत्याही परिस्थितीत पीसीचा वेग कमी होऊ देऊ नका कारण त्याचा परिणाम तुमच्या उत्पादन क्षमतेवर होतो. म्हणून वरील टिप्स्चा वापर करा आणि पीसी चा परफॉर्मन्स वाढवा.


तुमचा अभिप्राय लिहा: