सॉफ्टवेअर टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

Computer Knowledge in Hindi

http://www.itkhoj.com/computer-knowledge-hindi/

एमएस ऑफिस टिप्‍स् आणि ट्रिक्‍स जे तुमचे काम जलद गतीने करु शकतील

किरण पाटील | ऑगस्‍ट 16, 2014

तुम्ही दररोज Microsoft Word, Excel, PowerPoint, आणि Outlook यांचा वापर करतात. पण तरी सुध्दा तुम्ही एमएस ऑफिस मधील अनेक गोष्टींविषयी आणि ते कसे काम करतात याविषयी अवगत नसाल, परिणामी तुम्ही या अॅप्लीकेशनची 100% शक्तीचा वापर करत नाहीत. येथे एमएस ऑफिस बदद्ल काही काही टिप्स्आणि ट्रिक्स आहे ज्यांचा वापर करुन काम अधिक जलद गतीने करुन कार्यक्षमता वाढवता येईल.


MS – Word

1) परिच्छेद सहजपणे खाली किंवा वर सरकवा:

जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये अनेक परिच्छेद असतील आणि त्यातील एखादा चुकीच्या जागी असेल, जो तुम्हाला हलवायचा आहे. मग अश्या वेळी तो पॅराग्राफ सिलेक्ट करुन कट आणि पेस्ट न करता press [ALT]+ [SHFT] ↑ कि प्रेस करुन वर आणि [ALT]+ [SHFT] ↓ या कि ने खाली सरकवता येईल.सोप्प!


2) कट पेस्ट न करता अक्षरे किंवा परिच्छेद हलवा:

एखादा शब्द किंवा पुर्ण परिच्छेद एका ठिकाणाहून उचलून दुस-या ठिकाणी हलवायचा असेल तर तो सिलेक्ट करुन F2 कि प्रेस करावी आणि जेथे हवा असेल तथे कर्सर आणून [Enter] कि प्रेस करावी.


3) Change Case:

तुम्ही एखादा परिच्छेद टाईप केला आणि आता तुम्हाला याचे change the case करावयाचे आहे, तर फक्त [Shift] +[F3] कि प्रेस करावी.


4) जलद गतीने अक्षरे सिलेक्ट करा:

एखादा शब्द सिलेक्ट करण्यासाठी त्यावर डबल क्लिक करावे.

एखादया संपूर्ण परिच्छेद सिलेक्ट करण्यासाठी, त्या परिच्छेदामध्ये कोणत्याही ठिकाणी ट्रिबल क्लिक करावे.

जर तुम्हाला अधिक परिच्छेद एकाच वेळी सिलेक्ट करावयाचे असतील तर किंवा सिलेक्ट करण्यासाठीचा भाग खुप जास्त मोठा असेल तर या परिच्छेदापुर्वी insertion pointer आणावा नंतर [Shift] कि प्रेस करुन शेवटच्या ठिकाणी क्लिक करावे.

जर तुम्हाला वेगवेगळया ठिकाणांवरील शब्द किंवा परिच्छेद एकाच वेळी सिलेक्ट करावयाचे असतील तर सिलेक्ट करतांना [CTRL] कि प्रेस करुन ठेवावी.

तसेच तुम्ही अक्षरे उभ्या आकारात किंवा चौकोनी आकारात सिलेक्ट करु शकता. यासाठी [ALT] कि प्रेस करुन ठेऊन माऊस पॉइंटर ड्रॅग करावा.


5) शेवटच्या वेळेला असलेल्या ठिकाणार लगेज जा:

जर तुमच्या कडे खुप मोठे डॉक्युमेंट असेल ज्यात तुम्हाला बदल करावयाचा किंवा फॉरमॅटींग करावयाचे असेल तर अश्या वेळी अनेक वेळा आपण ज्या ठिकाणी आधी काम करीत होतो तेथे जावे लागते अश्या वेळी आधी काम करीत असलेल्या ठिकाणी लगेच जाण्यासाठी [Shift] + [F5] कि प्रेस करावी.


6) वर्ल्ड मधील पेज मध्ये कोणत्याही ठिकाणी टाईप करा:

तुम्हाला कल्पना आहे का वर्ल्ड चा वापर तुम्ही फळयासारखा करु शकता, म्हणजे यावर कोणत्याही ठिकाणी टाईप करता येते. फक्त तुम्हाला जेथे टाईप करावयाचे असेल तेथे डबल क्लिक करा आणि टाईपींग करायला सुरवात करा.


7) साध्या फॉरमॅट मध्ये अक्षरे रुपांतरीत करा:

जर तुम्ही वेब साईटवरील काही परिच्छेद कॉपी करुन वर्ल्ड मध्ये पेस्ट केले तर ते त्याच्या आधिच्या सर्व फॉरमॅटसह कॉपी होतात. अश्या वेळी या अक्षरांना साध्या फॉरमॅट मध्ये रुपांतरीत करण्यासाठी [Ctrl]+ Spacebar कि प्रेस करावी.


8) समानार्थी शब्द शोधा:

तुम्ही टाईप केलेल्या एखादया शब्दाचे समानार्थी शब्द बघण्यासाठी त्यावर राईट क्लिक करुन synonyms या पर्यायावर माऊस पाइंटर आणाल तर उजव्या बाजूला या शब्दाचे समानार्थी शब्द दिसतील.


MS Excel

1) खालील सेल मध्ये सूत्र (फॉरमुला) कॉपी करा

तुम्ही एक्सेल मध्ये एखादया सेल मध्ये सूत्र टाईप केलेले आहे आणि तेच तुम्हाला खालील सेल्स मध्ये हवे असतील तर fill handle ने ड्रॅग न करता, फक्त या fill handle च्या खालील बाजूला असलेल्या चौकोनावर डबल क्लिक करा (पण या सेल्स टेबल मध्ये असल्या पाहिजे).


2) एखादया रो किंवा कॉलम मध्ये महिना किंवा दिवस कॉपी करा:

तुम्हाला अशी परिस्थीती नक्कीच आठवत असेल जेव्हा टाईप केलेला महिना किंवा दिवस खालील सेल्स मध्ये कॉपी करण्यासाठी जर fill handle ड्रॅग केले तर तेथे क्रमवारीत म्हणजे January, February…. असे भरले जाते. पण तुम्हाला येथील सर्व सेल्स मध्ये तोच महिना किंवा दिवस हवा असेल तर ड्रॅग करतांना [Ctrl] कि प्रेस करावी.


3) एकाच वेळी अनेक सेल्स मध्ये डाटा टाईप करा :

जर तुम्हाला एकाच प्रकारचा डेटा (अक्षरे, नंबर किंवा सूत्र) अनेक सेल्स मध्ये हवे असेल तर एका ठिकाणी टाईप करुन ड्रॅग न करता या सर्व सेल्स आधि सिलेक्ट कराव्यात आणि नंतर एका सेल मध्ये हवे ते टाईप करुन [Ctrl] + [Enter] कि प्रेस करावी.


4) रिकाम्या जागा भरा :

तुम्ही एक्सेल मध्ये एक मोठा टेबल तयार केला आहे, पण काही कारणामुळे त्यात वेगवेगळया ठिकाणी असलेल्या अनेक रिकाम्या सेल्स आहेत. आता त्या सेल शब्द, नंबर किंवा सूत्राने भरायचा आहेत.

प्रथम टेबल मधील ज्या सेल्स मध्ये माहिती भरायची आहे, त्या सिलेक्ट कराव्यात. Ctrl + G कि प्रेस केली असता Go To ची एक विंडो ओपन होईल.येथील खालील बाजूचे Special या बटनावर क्लिक करावे आणि नंतर येथून Blank option हा पर्याय निवडून Ok करावे.आता येथील सर्व रिकाम्या सेल्स सिलेक्ट झालेल्या दिसतील. येथे हवे ते टाईप करुन Ctrl + Enter कि प्रेस करावी आणि जादू बघावी.


MS PowerPoint

1) जलद गतीने फॉरमॅटींग:

जर तुम्हाला एखादया टेक्स्ट बॉक्स मधील सर्व टेक्स्ट एकाच वेळी सिलेक्ट करायचे असतील, तर जुन्या पध्दतीने म्हणजे माऊस ड्रॅग करुन सिलेक्ट करु नका.

फक्त या टेक्स्ट बॉक्सच्या बॉर्डरवर क्लिक करा, आणि त्याची डॉटेड बॉर्डर हि सॉलीड लाईनमध्ये रुपांतरीत होईल. आता तुम्ही हवे ते फॉरमॅटींग केले तर ते या टेक्स्ट बॉक्स मधील सर्व अक्षरांना लागू होते.


2) एका सेकंदात डुप्लिकेट तयार करा:

जर तुम्ही काही ऑब्जेक्ट काढले असतील आणि त्यांचे डुप्लिकेट हवे असतील, तर फक्त [Ctrl] + [D] प्रेस करा. तसचे Normal View मध्ये सिलेक्ट केलेल्या slide वर [Ctrl] + [D] प्रेस केले तर त्याची डुप्लिकेट slide तयार होते.

याचा वापर Word, Excel आणि Outlook मध्ये सुध्दा करता येतो.


3) PowerPoint Show मधील मजकूरात बदल करा:

तुम्हाला कोणीतरी PowerPoint Show पाठवला आहे आणि तुम्हाला त्यात काही बदल करावयाचे आहे. यासाठी तुम्ही या Show वर जर डबल क्लिक केले तर हा शो रन होतो. पण यात बदल करण्यासाठी आधी PowerPoint चालू करा आणि नंतर हि फाईल यात ओपन करा. आता यात बदल करता येतील.


MS Outlook

1) महत्वाच्या व्यक्तींकडून आलेले मेलवर लक्ष ठेवण्याची गरज नाही

तुम्हाला आऊटलूक मध्ये दररोज खुप मेल्स येतात आणि त्यातील महत्वाच्या मेलवर तुम्हाला लक्ष ठेवावे लागते. मग अश्या वेळी या महत्वाच्या मेलसाठी एक वेगळी फॉरमॅटींग आधीच सेट करुन ठेवता येते. जेणेकरुन जेव्हा हे मेल येतील तेव्हा त्यांचा कलर आपोआप बदलेल आणि तुम्हाला ते लगेच दिसतील.

कृती -तुमचा अभिप्राय लिहा: