सॉफ्टवेअर टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

Computer Knowledge in Hindi

http://www.itkhoj.com/computer-knowledge-hindi/

विंडोज 8  Refresh किंवा Reset कसे करावे ?

किरण पाटील | सप्‍टें. 2013

जर तुमच्या कडे विंडोज 8 असलेल्या कॉम्पयुटर मध्ये refresh, reset, किंवा restore करु शकता. कॉम्प्युटरला Refresh केले तर विंडोज नविन इनस्टॉल होते, पण पर्सनल फाईल आणि सेटींग तश्याच राहतात. तसचे विंडोज सोबत असलेले अॅप्लीकेशन तसेच राहतात.पण Reset केले तर विंडोज नविन इन्स्टॉल होते आणि पर्सनल फाईल, सेटींग आणि सर्व अॅप्लीकेशन डिलीट होतात. विंडोज नविन इनस्टॉल केल्या प्रमाणेच विंडोज Reset होते, आणि पुर्णपणे नविन विंडोज इनस्टॉल होते.कॉम्प्युटर ला Restore करणे म्हणजे सिस्टीम मध्ये आत्ताच केलेले बदल undo करणे.


Refresh your PC without affecting your files

 1. माऊस पॉइंटर स्क्रिनच्या उजव्या बाजुला खालच्या कोप-यात आणावा, येथे Setting आणि नंतर Change PC settings वर क्लिक करावे किंवा Windows Key + I कि प्रेस करुन Change PC settings वर क्लिक करावे.
 2. स्क्रोल करीत खालील बाजुला असलेल्या “Refresh your PC without affecting your files” वर क्लिक करावे. नंतर “Get started” या बटनावर क्लिक करावे.
 3. नंतर “Refresh your PC” चा एक मॅसेज बॉक्स येईल. येथे तुम्हाला हवे ते ऑप्शन सिलेक्ट करून Next वर क्लिक करावे.
 4. जर तुम्ही विंडोज 8 ची DVD टाकली नसेल तर “Some files are missing” असा मॅसेज येईल आता विंडोज 8 ची DVD टाकून थोडा वेळ वाट बघावी.
 5. नंतर  “Ready to refresh your PC” ची स्क्रिन येईल. येथे Refresh बटनावर क्लिक करावे.
 6. आता विंडोज Refresh ची प्रोसेस सुरु होईल व कॉम्प्युटर रिस्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला एक नविन फ्रेश विंडोज 8 मिळेल.To reset your PC

 1. माऊस पॉइंटर स्क्रिनच्या उजव्या बाजुला खालच्या कोप-यात आणावा, येथे Setting आणि नंतर Change PC settings वर क्लिक करावे किंवा Windows Key + I कि प्रेस करुन Change PC settings वर क्लिक करावे.
 2. स्क्रोल करीत खालील बाजुला असलेल्या “Remove everything and re-install Windows” खालील “Get started” या बटनावर क्लिक करावे.
 3. नंतर “Reset your PC” चा मॅसेज येईल. येथे तुम्हाला हव्या असलेल्या सेटींग सिलेक्ट करुन Next बटनावर क्लिक करावे.
 4. जर तुम्ही विंडोज 8 ची DVD टाकली नसेल तर “Some files are missing” असा मॅसेज येईल आता विंडोज 8 ची DVD टाकून थोडा वेळ वाट बघावी.
 5. नंतर : “Just remove my files.” हा पर्याय सिलेक्ट केल्यावर “Ready to reset your PC” ची स्क्रिन येईल. येथिल Reset बटनावर क्लिक करावे.
 6. आता विंडोज 8 ची Reset प्रोसेस सुरु होईल.

तुमचा अभिप्राय लिहा: