सॉफ्टवेअर टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

Computer Knowledge in Hindi

http://www.itkhoj.com/computer-knowledge-hindi/

Undeletable, Unrenamable Folders तयार करा.

किरण पाटील | एप्रिल 2013

काही वेळा महत्वाची माहीती साठविण्यासाठी अश्या फोल्डरची आवश्यक्ता भासते जे डिलीट होणार नाही तसेच त्याच्या नावात देखील बदल होणार नाही. ही ट्रिक्स तुमची इच्छा पुर्ण करेल.जर तुम्हाला असे फोल्डर तयार करावयाचे असेल तर ते पुढे दिलेल्या नावापैकीच नावाने बनेल. con, aux, lpt1, lpt2, lpt3, lpt4, lpt5, lpt6, lpt7, lpt8 आणि lpt9.

यामागील सर्वसाधारण संकल्पना ही कि वर्ल्डस ची आहे. Keywords हे प्रोग्रॅमींग साठी वापरले जाणारे राखीव नावे आहेत आणि त्यांचा वापर आपण variables तयार करण्यासाठी वापरु शकत नाही. विंडोज सुध्दा काही keywords त्यातील प्रोग्रॅम्ससाठी वापरते. वरील त्यापैकी आहेत.पण वरील फोल्डर्स command prompt मध्येच तयार करता येतात.


Steps:

  1. Start ला क्लिक करावे.
  2. Run ला क्लिक करावे. येथे cmd टाईप करावे.
  3. command prompt ओपन झाल्यानंतर आपल्याला ज्या ड्राईव्ह मध्ये फोल्डर तयार करावयाचा असेल त्या ड्राईव्ह मध्ये जाण्यासाठी <drive-name>: असे टाईप करुन Enter कि प्रेस करावी. उदा. जर D ड्राईव्ह मध्ये फोल्डर तयार करावयाचा असेल तर येथे D: असे टाईप करुन Enter कि प्रेस करावी.
  4. नंतर md con\ असे टाईप करुन Enter प्रेस करावे.
  5. येथे तुम्ही con च्या जागी वरील पेकी फोल्डर साठी कोणतेही नांव देऊ शकता.
  6. आता विंडो मध्ये डिलीट न करता येण्यासारखे आणि नांवात बदल न करु शकणारे फोल्डर तयार झालेले असेल.


Deleting the Folder

जरी विंडोज मधून हे फोल्डर डिलीट करणे शक्य नसले तरी command prompt मध्ये "rd con\" or "rd lpt1\" या कमांडचा वापर करुन डिलीट करणे शक्य होते.


Windows Compatibility: This works on Windows XP, Windows Vista, Windows 7 and Windows 8.
तुमचा अभिप्राय लिहा: