नेटवर्किंगटिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

तुमच्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर आहे काय ? तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर असलेल्या महत्वाच्या फाईल कोणिही अॅक्सेस करु नये असे वाटते का? जर दोघा प्रश्नांचे तुमचे उत्तर होकारार्थी असेल तर तुम्ही हे वाचलेच पाहिजे कारण हे तुमच्याच साठी आहे. तुम्हाला कॉम्पयुटर सेक्युरीटेचा प्रॉब्लेम आहे, ज्याबददल तुम्हाला अजुन माहित नाही. तुम्हाला administrative share बददल काही माहिती आहे का?  सोप्या भाषेत सांगायचे झालेच तर विंडोज इन्टॉल होतांना तयार झालेले हे एक automatic share आहे. फक्त एक कॉम्प्युटर असेल तर प्रश्नच नाही, पण जर तुमचा कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये असेल तर मग सुरक्षेचा प्रश्न उदभवतो कारण विंडोज मध्ये फक्त फाईल्स किंवा फोल्डरच शेअर होत नाही तर संपुर्ण ड्राईव्ह शेअर होते. प्रत्यक्षात हे प्रत्येक पार्टीशनसाठी सारखे नसते. समजा तुमच्या कॉम्प्युटर मध्ये C: आणि D: हे दोन ड्राईव्ह आहेत, पण ब-याचदा युजर्सला कोणता ड्राईव्ह automatically shared आहे ते माहिती नसते आणि येथेच खरा प्रॉब्लेम होतो.तुमच्या कॉम्प्युटर मध्ये ज्या व्यक्तीला administrator level  rights असताता ती administrative shares व्दारे शिरकाव करु शकते आणि तुमच्या कॉम्प्युटर मधील कोणतीही फाईल अॅक्सेस करु शकते. ती व्यक्ती तुमच्या कॉम्प्युटर मधील महत्वाच्या फाईल कॉपी करु शकते, तुमचे मेल वाचु शकते किंवा तुमचा महत्वाचा डेटा डिलीट करु शकते.

मग हया प्रॉब्लेम कसा सोडवावा?

विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये administrative shares कसे शोधावे -

 1. डेस्कटॉप वरील My Computer वर राईट क्लिक करावे आणि Manage सिलेक्ट करावे.
 2. नंतर Computer Management console लोड होईल.
 3. यातील Shared Folders ला सिलेक्ट करावे.
 4. आता डाव्या बाजुला असलेल्या पर्यायातुन तुम्हाला तुमचा ड्राईव्ह शेअर आहे किंवा नाही हे समजते. जर Share Name खाली ड्राईव्ह च्या नंतर $ असे चिन्ह असेल तर तो ड्राईव्ह शेअर केलेला आहे. उदा. C$, D$.

जर तुम्हाला वरील प्रमाणे शेअरिंग दिसले आणि तुम्हाला हे डिसॅबल करावयाचे असेल तर खाली स्टेप्स दिलेल्या आहेत.

Loading the Registry Editor

 1. स्टार्ट बटनावर क्लिक करावे.
 2. Run सिलेक्ट करावे.डायलॉग बॉक्स मध्ये Regedit टाईप करुन ok बटनावर क्लिक करावे.
 3. Registry Editor ची खालील प्रमाणे विंडो ओपन होईल.
 4. येथे पुढील मार्गाने जावे - HKEY_LOCAL_MACHINE \ System \ CurrentControlSet \ Services \ LanManServer \ Parameters.
 5. आता स्क्रिनच्या उजव्या बाजुला REG_DWORD या टाईप मध्ये AutoShareWks या नावाचा पार्यायावर डबल क्लिक करावे. आणि याची Value 0 (Zero) दयावी.
 6. जर येथे AutoShareWks हा पर्याय दिसत नसेल तर खालील प्रमाणे स्टेप्स कराव्यात -
 7. उजव्या बाजुच्या editor मध्ये right click करावे.
 8. New सिलेक्ट करावे, नंतर DWORD सिलेक्ट करावे.येथे AutoShareWks हे नाव दयावे.याची Value 0 दयावी.
 9. Registry Editor बंद करावा.
 10. कॉम्पयुटर Restart करावे.
 11. Restart झाल्यानंतर पुन्हा Computer Management console मध्ये जाऊन sharing चेक करावे.


 


ईतर नेटवर्क युजर कडून तुमच्या फाईल कश्या सुरक्षित कराल?

किरण पाटील |  सप्टेंबर 2012

तुमचा अभिप्राय लिहा: