हार्डवेअर टिप्स आणि ट्रिक्स

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

आय.टी. टिप्स आणि ट्रिक्स

ज्ञानाच्या कक्षा वाढवा!

सेक्यूरिटी

इंटरनेट

मोबाइल

नेटवर्किंग

हार्डवेअ

सॉफ्टवेअर

Internet Tips and Trics in Marathi
Mobie Tips and Trics in Marathi
Security Tips and Trics in Marathi

1) Delete unnecessary files

तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये सर्च करा. तुम्हाला तेथे अनेक नको असलेल्या फाईल्स दिसतील ज्या तुम्हाला भविष्यात कधी उपयोगी पडणार नाहीत. या एकतर ऑफिस फाईल्स असतील किंवा इतर इमेज आणि मुव्हीज असु शकतील.

Free up disk space:

Delete temp files:

टेम्पररी फाईल्स या आपोआप तयार होतात आणि याबददल आपल्यापैकी थोडयाच जणांना हे माहित असते की कॉम्प्युटरचा स्पीड वाढवण्यासाठी त्या डिलीट कराव्या लागतात.

जेव्हा आपण एखादया फाईलवर काम करीत असतो तेव्हा त्याची एक temporary file प्रत्येक काही मिनीटात बॅकअप म्हणुन आपोआप तयार होते. जेव्हा आपण हि फाईल save करुन close करतो तेव्हा हि temporary फाईल आपोआप डिलीट होते. पण जर अचानक कॉम्पयुटर बंद केला तर हि temp फाईल डिलीट होत नाही. नंतर या फाईलला आपण पुन्हा recover करु शकतो. तसेच काही temp प्रोग्रॅम फाईल डिलीट होत नाही. या temp फाईल्स कॉम्प्युटरची खुप मेमरी वापरतात.

या फाईल्स डिलीट करण्यासाठी –

  1. Click Start – Run
  2. येथे  “%temp%” असे टाईप करावे, आणि Ok बटनावर क्लिक करावे.
  3. आता temp फोल्डर ओपन होईल आणि येथे तुम्हाला तयार झालेल्या temp files आणि folder दिसतील.
  4. हे सर्व select all करुन डिलीट करावे.
  5. येथील काही फाईल्स किंवा फोल्डर्स डिलीट होत नाहीत, कारण ते चालु असलेल्या काही प्रोग्रॅम्स व्दारे वापरले जात असतात.


2) Delete Temporary Internet Files:

इंटरनेट वातरत असतांना सुध्दा वेब ब्रॉउझर्स हे आपण ओपन केलेल्या वेब पेजसमधील cookies, images च्या स्वरुपातील डाटा साठविण्यासाठी Temporary Internet files तयार करतात.

हि history डिलीट करण्यासाठी Internet Explorer मधील Options मध्ये जावे आणि येथील सर्व history डिलीट करावी.


3) Disk Clean up:

कॉम्प्युटरमधील सर्व नको असलेल्या फाईल्स एकाच वेळी डिलीट करण्यासाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे.

Steps:

Start ला क्लिक करावे – All Programs – Accessories – System Tools – disk Clean up.

येथुन drive सिलेक्ट करावा आणि Ok बटनावर क्लिक करावे.आता Disk Cleanup Window ओपन होईल.येथुन ज्या फाईल्स डिलीट करावयाच्या आहेत त्या यातील लिस्ट मधुन सिलेक्ट कराव्यात आणि Ok बटनावर क्लिक करावे.


3) Remove unwanted programs

जर तुम्ही कॉम्प्युटर मध्ये खुप प्रोग्रॅम्स इन्स्टॉल केलेले असतील तर याचा परीणाम कॉम्प्युटरच्या स्पीड वर होतो. कारण प्रत्येक प्रोग्रॅम हा कॉम्प्युटरची मेमरी वापर असतो. म्हणनू जे प्रोग्रॅम नको असतील ते काढून टाकावेत.


4) Defrag to speed up your computer

तुम्ही तुमचा कॉम्प्युटर शेवटी कधी defragment केला होता हे आठवतय? आपण ब-याचदा कॉम्प्युटर defragment करण्याचे विसरुनच जातो.

Disk Defragment ही Microsoft Windows मधील एक utilities आहे ज्याचा वापर access speed वाढविण्यासाठी फाईल्स क्रमवारीत लावले जातात जेणेकरुन फाईल साठविण्यासाठी सलग जाता मिळेल. Defragment हे फाईल वाचण्यासाठी आणि त्यावर काम करण्यासाठी लागणारा वेळ वाचतो.

Steps:

  1. My Computer ओपन करावे.
  2. जो Drive Defragment करायचा आहे त्यावर right click करुन Properties मध्ये जावे.
  3. Tools टॅब मधील Defragment Now यावर क्लिक करावे.


Update you RAM or use ReadyBoost

तुम्ही ReadyBoost या पर्यायाव्दारे RAM वाढवू शकता. या पर्यायाव्दारे USB Pen Drive किंवा Memory Card चा उपयोग RAM म्हणनू करता येतो. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


5) Always use good antivirus:

नेहमी चांगल्या antivirus चा वापर करावा. इंटरनेवर free antivirus शोधण्यात वेळ घालवू नका. आज अनेक चांगले antivirus उपलब्ध्आहेत. जरी तुम्ही घरच्या कॉम्प्युटरवर इंटरनेट वापरत नसाल तरी सुध्दा USB Pen Drive किंवा CD/DVD मधून virus येण्याची शक्यता असते, आणि हे virus फक्त कॉम्प्युटरच slow करीत नाहीत तर तुमचा डाटा नष्ट होण्याची सुध्दा शक्यता असते.


6) Avoid using many programs at time.

एकाच वेळी अनेक प्रोग्रॅम्सवर काम करणे टाळा. जर तुम्ही Maya, Photoshop किंवा video editing सारख्या मोठया प्रोग्रॅम्स मध्ये काम करीत असाल तर त्या वेळी इतर प्रोग्रॅम मध्ये काम करणे टाळा.


7) Update your windows regularly:

Operating System नेहमी अपडेट ठेवा. हे अपडेट कॉम्प्युटरमधील सुरक्षेची कमतरता कमी करतात आणि कॉम्प्युटर hack होण्यापासुन तसेच virus पासुन वाचवतात.


8) Remove programs from startups.

जर तुमचा कॉम्प्युटर सुरु होण्यसाठी खुप वेळ घेत असेल तर startup मधुन नको असेलेले प्रोग्रॅम्स काढून टाका.

Start ला क्लिक करुन Run मध्ये जावे.येथे msconfig टाईप करुन Ok ला क्किक करावे.

येथे एक System Configuration ची विंडो ओपन होईल.येथील Startup Tab मध्ये जावे.येथे startup मध्ये असलेल्या प्रोग्रॅमची लिस्ट दिसेल.यातील नको असलेले प्रोग्रॅम्स काळजीपुर्वक निवडा. येथील antivirus प्रोग्रॅम कधील काढू नका.

कॉम्प्युटरचा स्पिड वाढवण्याच्या 10 टिप्स

किरण पाटील | सप्टेंबर 2012

 

तुमचा अभिप्राय लिहा: