Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

ज्ञानधारित प्रश्न्

कॉम्यूटर मधील BIOS काय आहे? ते कसे काम करते?

एप्रिल 21, 2015

What is BIOS:

BIOS का कॉम्प्यूटर सिस्टिम मधील एक अविभाज्य भाग आहे आणि त्याचा अर्थ Basic Input Output System असा होय. BIOS हा फर्मवेअरचा एक प्रकार आहे आणि ते पीसी सुरू होतांनाचे हे पहिले  सॉफ्टवेअर आहे. ऑपरेटींग सिस्टिम लोड होतांना BIOS चा उपयोग रॅम, प्रोसेसर, किबोर्ड, माऊस, हार्ड ड्राइव्ह सारखे हार्डवेअर ओळखणे आणि कन्फिग्यर करण्यासाठी होतो आणि यानंतरच ऑपरेटींग सिस्टिम कॉप्यूटर मध्ये लोड होते.


Where BIOS is located?

BIOS चे सॉफ्टवेअर मदरबोर्ड वर नॉन-व्होलॅटाइल रॉम चिप वर स्टोअर असते. परंतू ही रॉम चिप EEPROM (Electrically Erasable and Programmable Read Only Memory) प्रकारातील असते, म्हणजेच यातील BIOS हा री-राइट केला जाऊ शकतो किंवा अपडेट होऊ शकतो.Complementary metal oxide semiconductor (CMOS) या चिप मध्ये BIOS च्या सर्व सेटींग्ज स्टोअर केलेल्या असतात. या CMOS चिपला बॅटरीने पॉवर दिलेली असते. आणि म्हणूनच जेव्हा यातील बॅटरी काढली जाते आणि पून्हा लावली जाते तेव्हा यातील सर्व सेटींग्ज डिफॉल्ट रिसेट हेातात.


Function of BIOS:

BIOS चे मुख्य कार्य हे पिसी सूरू होत असतांना ऑपरेटींग सिस्टिम लोड करणे.जेव्हा तुम्ही पीसी सुरू करता तेव्हा, BIOS पुढील कामे करतो -कस्टम सेटींग करीता CMOS सेटींग चेक करतो.इंटरप्ट हँडलर आणि डिव्हाइस ड्राइव्हर्स् लोड करतो.रजिस्टर इनशलाइज करणे आणि पॉवर मॅनेजमेंट.Power-on self-test (POST) परफॉर्म करणे.सिस्टिम सेटींग दर्शविणे.बुटेबल डिव्हाइसेस कोणते आहेत हे ठरविणे.बुट स्टार्टअप प्रोसेस सुरू करणे.


How do I access my computer's BIOS?

BIOS सेटींग मध्ये जाण्यासाठी पीसी सूरू झाल्यानंतर लगेच किबोर्ड वरील F2, F12, Delete किंवा Esc कि प्रेस करा. ही पध्दती BIOS मॅन्यूफॅक्चर्स प्रमाणे बदलते.


Configuring BIOS

वरील पध्दतीप्रमाणे जेव्हा तुम्ही BIOS सेटींग्ज मध्ये येतात, तेव्हा तुम्हाला येथे एक निळया रंगाची टेक्स्ट स्क्रिन दिसेल, ज्यात अनेक ऑप्शन्स असतील. यातील काही ऑप्शन्स हे स्टँडंर्ड असतात तर काही  BIOS च्या मॅन्यूफॅक्चर्स प्रमाणे बदलतात. सामान्य पणे BIOS सेटअप ची स्क्रिन पुढील पाच टॅब मध्ये विभागलेली असते Main, Advanced, Power, Boot आणि Exit. यातील प्रत्येक टॅब मध्ये अनेक वेगवेगळे ऑप्शन्स असतात.

पण जर तुम्ही BIOS सेटींग मध्ये बदल करीत असाल तर ते करतांना काळजी घ्या. यातील व्हॅल्यू मध्ये बदल करण्यासाठी पेज अप आणि पेज डाउन किज चा उपयोग होतो तसेच नेव्हिगेट करतांना अॅरो किजचा उपयोग होतो. सेटींग सेव्ह करून बाहेर येण्यासाठी F10 कि प्रेस करावी.


How to Update BIOS

BIOS हा पीसी मधील सर्वात क्रिटीकल पार्ट आहे. आणि म्हणूनच अत्यंत गरज असेल तरच BIOS अपडेट करावा कारण ही प्रोसेस खुप किचकट आहे आणि जर काही एरर आला तर तुमचा पीसी अनबूटेबल होऊ शकतो. BIOS अपडेट केल्याने पीसी मधील अनेक अडचणी सोडवता येतात. BIOS अपडेट करण्यासाठी पूढील स्टेप्स आहेत -

1) विंडोज मध्ये तुमच्या BIOS चे व्हर्जन तपासा:

कॉम्प्यूटरच्या मदरबोर्ड वरील BIOS चे व्हर्जन शोधण्याचे अनेक मार्ग आहेत -

अ) कॉम्पयूटर रीस्टार्ट करा आणि BIOS मध्ये या. यात तुम्हाला कॉप्यूटरच्या मदरबोर्ड द्वारे वापरले BIOS चे व्हर्जन सापडेल.

ब) Win + R कि प्रेस करा  --- सर्च बार मध्ये "msinfo32" टाइप करा आणि Ok वर क्लिक करा. आता System Information ची विंडो ओपन होईल. येथे तुम्हाला BIOS चे व्हर्जन सापडेल.

क) कमांड प्रॉम्प्ट मध्ये " systeminfo | findstr /I /c:bios " टाइप करा.


2) BIOS चे अपडेड व्हर्जन उपलब्ध आहे का हे तपासा:

एकदा कॉम्प्यूटर मधील BIOS चे व्हर्जन सापडले तर आता वेळ आहे ते अपडेट करण्याची. BIOS चे अपडेट व्हर्जन उपलब्ध आहे कि नाही यासाठी ब्रँडेड पीसी च्या साइट वर सर्च करा आणि जर पीसी ब्रँडेड नसेल तर मदरबोर्ड मॅन्युफॅक्चरच्या साइटवर सर्च करा. येथून BIOS चे योग्य ते व्हर्जन डाउनलोड करा.3) Read the included documentation:

BIOS अपडेट करण्यापूर्वी, तुमचा पीसी अनबूटेबल होणे टाळण्यासाठी अपडेट मधील डॉक्यूमेंट काळजीपूर्वक वाचा.


4) Update your BIOS:

BIOS चे व्हर्जन अपडेड करण्यापूर्वी सर्व प्रोग्राम्स बंद करा आणि .exe फाइल रन करा. BIOS अपडेट झाल्यानंतर पीसी रिबूट होइल आणि BIOS अपडेट होइल.


टीप: ब-याच BIOS मध्ये आधिचे व्हर्जन बॅकअप घेण्याची सुविधा असते. जर अशी सुविधा असेल तर अपडेट करण्यापूर्वी जून्या BIOS व्हर्जनचा बॅकअप अवश्य घ्या.तुमचा अभिप्राय लिहा: