Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

ज्ञानधारित प्रश्न्

डिव्हाइस ड्राइव्हर्स् – तुम्हाला त्यांच्याबदद्ल काय माहित असायला हवे?

मार्च 17, 2015

डिव्हाइस ड्राइव्हर्स् काय आहेत?

डिव्हाइस ड्रायव्हर हे एक सॉफ्टवेअर आहेत, जे तुमच्या कॉम्प्यूटरला इतर हार्डवेयर डिव्हाइसेस सोबत संपर्क करण्यास परवानगी देतात. डिव्हाइस ड्रायव्हर हे कॉम्प्यूटरला जोडलेल्या कोणत्याही डिव्हाइसला ऑपरेट किंवा कंट्रोल करतात. डिव्हाइस ड्राइव्हर नसतील तर तुमच्या कॉम्प्यूटरला जोडलेले व्हिडीओ कार्ड, प्रिंटर किंवा इतर डिव्हाइसेस व्यवस्थित काम करू शकत नाहीत.जेव्हा तुम्ही एखादा ब्रॅडेंड पीसी किंवा लॅपटॉप घेता, तेव्हा त्यात अनेक डिव्हाइसेस त्यांच्या ड्रायव्हर सह इनबिल्ट असतात. पण नंतर जेव्हा तुम्ही एखादे नविन डिव्हाइस कनेक्ट करता तेव्हा त्याचे ड्रायव्हर तुम्हाला इन्स्टॉल करावे लागतात.डिव्हाइस ड्रायव्हर हे त्या डिव्हाइससोबत कॉम्प्यूटर बस किंवा कम्युनिकेशन सबसिस्टिमच्या मदतीने संपर्क साधतात. हे अॅप्लीकेशन सॉफ्टवेअर किंवा ऑपरेटींग सिस्टिम व्दारे डिव्हाइसला कमांड देतात किंवा त्याच्याकडील डेटा प्राप्त करतात.


डिव्हाइस ड्राइव्हर का आवश्यक आहेत?

कॉम्प्यूटर आणि त्यांची ऑपरेटींग सिस्टिम हे नेहमीच त्यांना जोडलेले प्रत्येक डिव्हाइसचे नियंत्रण करण्यासाठी सक्षम असू शकत नाहीत. आणि म्हणूनच प्रत्येक उत्पादन हे त्यांच्या ड्रायव्हर सह बाहेर येते. ऑपरेटींग सिस्टिम ही ड्रायव्हरला "कॉल" करतात आणि ड्रायव्हर्स हे डिव्हाइसेसला "ड्राइव्ह" करतात.जेव्हा एखादे नविन हार्डवेअर डिव्हाइस जसे प्रिंटर, व्हिडीओ कार्ड किंवा साउंड कार्ड हे कॉम्प्यूटरला जोडले जातात, तेव्हा त्याचे ते व्यवस्थित रन होण्यासाठी त्याचे ड्रायव्हर हे इन्स्टॉल करावेच लागतात. जेव्हा हे डिव्हाइसेस बदलवले जातात, तेव्हा त्यांचे ड्रायव्हर सुध्दा बदलतात. तुमच्या ऑपरेटींग सिस्टिमवर डिव्हाइस ड्रायव्हर अवलंबून असतात आणि ते 8 बिट, 16 बिट, 32 बिट आणि अलीकडील 64 बिट असू शकतात. या डिव्हाइसेसच्या निर्मात्यांकडून त्यांच्या ड्रायव्हर्सची नविन आवृत्ती लिहीली जाते आणि मार्केट मध्ये आणली जाते.


डिव्हाइस ड्राइव्हर चे स्पष्टीकरण:

डिव्हाइस ड्राइव्हर हा मुळात एक अनुवादक आहे. त्याच्या इनपुट मध्ये उच्चस्तरीय आदेश असतात आणि आउटपूट मध्ये लो-लेव्हल, हार्डवेअर-विशिष्ट सूचना समाविष्टीत असतात, ज्यांचा वापर हार्डवेअर कंट्रोलर कडून केला जातो, जो I / O डिव्हाइसला उर्वरित ऑपरेटींग सिस्टिमशी इंटरफेस करण्यास मदत करतात.


डिव्हाइस मॅनेजर:

विंडोज मध्ये तुम्ही डिव्हाइस मॅनेजरचा उपयोग तूमच्या पीसीवरील इन्स्टॉल डिव्हाइसेस बघण्यासाठी आणि ते योग्यरितीने कार्य करीत आहे का तपासण्यासाठी आणि हार्डवेअर सेटिंग्ज बदलण्यासाठी करू शकता.


डिव्हाइस ड्राइव्हर मधील समस्या तपासा :

वरील डिव्हाइस मॅनेजर मध्ये हव्या त्या डिव्हाइसेसच्या श्रेणी वर डबल टॅप करा किंवा डबल क्लिक करा. जर तेथे एखादे पिवळे चेतावणी चिन्ह असेल तर त्या ड्रायव्हर मध्ये काहीतरी समस्या असू शकते.


डिव्हाइस enable किंवा disable करा:

जर तुम्हाला एखादे डिव्हाइस डिसॅबल करायचे असेल तर डिव्हाइस मॅनेजर मधील या डिव्हाइसवर राइट क्लिक करा आणि disable वर क्लिक करा.तसेच पुन्हा इनॅबल करण्यासाठी यावर राइट क्लिक करून Enable ला क्लिक करा.


डिव्हाइस ड्राइव्हर अपडेट करा:

जर एखादे हार्डवेअर डिव्हाइस योग्यरित्या काम करीत नसेल, तर तुम्हाला कदाचीत त्याचे ड्रायव्हर अपडेट करावे लागेल. ड्रायव्हर अपडेट करण्याचे अनेक मार्ग आहेत –

डिव्हाइस मॅनेजर मधील या ड्रायव्हरवर राइट क्लिक करून Update ला क्लिक करावे.विंडोज अपडेटचा वापर करून आपोआप याचे अपडेटेड ड्रायव्हर इन्स्टॉल करू शकता.मॅन्यूफॅक्चर्सच्या वेबसाइटवर जाऊन अपडेटेड ड्रायव्हर डाऊनलोड करून इन्स्टॉल करता येतात.जर तुम्हाला आपोआप आणि सहजपणे ड्रायव्हर कसे अपडेट करावे याविषयी अधिक माहिती हवी असेल तर मागील पोस्ट साठी येथे क्लिक करा – आता तुम्ही जलद गतिने एका क्लिकने सिस्टीमचे ड्राइव्हर्स् अपडेट करू शकता


ड्राइवर रोल बॅक करा:

डिव्हाइस ड्राइव्हर रोल बॅक हे तुम्ही पूर्वी वापरत असलेले ड्राइव्हर reinstalls करते आणि तुम्ही नविन ड्राइव्हर टाकण्यासाठी केलेले बदल पुन्हा रिस्टोर होतात.तुमचा अभिप्राय लिहा: