Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

ज्ञानधारित प्रश्न्

विंडोज फायरवॉल म्‍हणजे काय? आणि ते कसे काम करते?

किरण पाटील | सप्‍टेंबर 06, 2014

विंडोजच्या प्रत्येक आवृत्तीसोबत सर्वात महत्वाचे सुरक्षीततेचे टूल येते आणि ते म्हणजे विंडोज फायरवॉल. अॅन्टी व्हायरस प्रोग्रॅमपेक्षा विंडोज फायरवॉल हे वेगळे आहे आणि तुमच्या कॉम्प्युटरच्या सुरक्षीततेसाठी तुम्हाला फायरवॉल, अॅन्टी व्हायरस आणि अॅन्टी मालवेअर प्रोग्रॅमची आवश्यक्ता आहे.


What is the Windows Firewall?

विंडोज फायरवॉल हे एक सॉफ्टवेअर आहे जे सेक्युरीटी गार्ड प्रमाणे काम करते आणि नेटवर्क किंवा इंटरनेटवरुन येणारी माहिती तपासते आणि तुमच्या फारवॉलच्या सेटींग प्रमाणे ती माहिती पाठवायची कि नाही हे ठरवते.

फायरवॉल हे हॅकर्स किंवा malicious software ने तुमच्या कॉम्पुटरचा नेटवर्क किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ताबा मिळविण्यापासुन प्रतिबंध करते. तसेच फायरवॉल तुमच्या कॉम्प्युटरला इतर कॉम्प्युटरकडे malicious software पाठविण्यापासुन परावृत्त करते.
How it works?

विंडोज मध्ये मुलभूतरित्या विंडोज फायरवॉल हे सुरु असते, आणि ते बॅकग्राउंड मध्ये शांतपणे काम करीत असते. विंडोंज फायरवॉल मध्ये पूर्वनिर्धारित नियमांचे संच असतात जे तुम्हाला अनेक कामे करण्याची परवानगी देतात. उदा. browse the Internet, use instant messengers, share files, folders and devices इ. तुम्हाला जोपर्यंत तुमच्या मर्जीप्रमाणे फायरवॉल configure करण्याची गरज पडत नाही तोपर्यंत फायरवॉल ओपन करण्याची गरज नाही.

जेव्हा तुम्ही एखादा प्रोग्रॅम इन्स्टॉल करतात तेव्हा काही प्रोग्रॅम्सला संवाद साधण्यासाठी इंटरनेटची आवश्यक्ता असते. मग अश्या वेळी इंटरनेटवरुन येणा-या या कनेक्शनला प्रतिबंध करण्याचे काम फायरवॉल करते तसेच तुम्हाला या कनेक्शनला परवानगी दयावयाची आहे कि नाही याची सुचना देतो. Allow Access ला क्लिक करुन तुम्ही परवानगी देऊ शकतात नाहीतर Cancel करावे.

पण विंडोज फायरवॉल हे सर्व प्रोग्रॅमला बाहेर इंटरनेटव्दारे कनेक्शन करण्याची पुर्ण परवानगी आधिच देऊन टाकतो.

विंडोज फायरवॉल मध्ये तुम्ही हे protection आणि notifications विंडोजमधील प्रत्येक नेटवर्क प्रोफाईल Home, Work, आणि Public साठी configure करु शकता.
How to open Windows Firewall?

विंडोज फायरवॉल सुर करण्यासाठी पुढील मार्गाने जावे -

Control Panel -- System and Security -- Windows Firewall.

किंवा सर्च बार मध्ये फक्त Firewall टाईप करावे.


How to Turn On or Off the Windows Firewall?

पूर्वनिर्धारीतपणे विंडोज फायरवॉल हे सुरुच असते. जर तुम्ही administrator युझर असाल तर तुम्ही फायरवॉल चालू किंवा बंद करु शकता.

यासाठी फायरवॉलच्या विंडोच्या डाव्या बाजूला असलेल्या "Turn Windows Firewall on or off" या पर्यायावर क्लिक करावे.

आता settings customize करण्यासाठी नविन विंडो ओपन होईल.

येथे तुम्हाला पुढील पर्याय दिसतील, ज्यातील योग्य तो पर्याय निवडून शेवटी Ok बटनावर क्लिक करावे.

Turn on Windows Firewall

विंडोज फायरवॉल हे आधिच ऑन असते आणि ते ब-याच प्रोग्रॅमला संवाद साधण्यासाठी बंदी आणते. जर तुम्हाला एखादा प्रोग्रॅमला फायरवॉलने इंटरनेव्दारे संवाद साधण्याची परवानगी दयावी असे वाटत असेल तर तुम्हाला allowed programs च्या यादीत हा प्रोग्रॅम टाकावा लागेल.


Block all incoming connections, including those in the list of allowed programs

जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त सुरक्षीततेची गरज असेल तेव्हा हा पर्याय निवडावा आणि तो तुमच्या कॉम्प्युटरला इतरांकडून झालेले सर्व अनपेक्षीत प्रयत्नांना अटकाव करेल.


Notify me when Windows Firewall blocks a new program

जर हा पर्याय निवडला तर विंडोज फायरवॉल हा जेव्हा एखादा नविन प्रोग्रॅमला block करेल तेव्हा त्याची सुचना तुम्हाला देईल तसेच तो unblock करण्यासाठी पर्याय देईल.


Turn off Windows Firewall (not recommended)

हा पर्याय निवडला तर विंडोज फायरवॉल बंद होईल. पण दुसरा फायरवॉल सुरु नसेल तर हा पर्याय निवडणे टाळा नाहीतर तुमच्या काम्प्युटरची सुरक्षीतता कमी होईल.


To allow a program to communicate through Windows Firewall

विंडोज फायरवॉलच्या विंडोच्या डाव्या बाजूला असलेल्या Allow a program or feature through Windows Firewall या पर्यायावर क्लिक करावे.

येथे तुम्हाला विंडोजमधील प्रोग्रॅमची लिस्ट दिसेल.

येथे जो प्रोग्रॅम तुम्हाला allow करावयाचा आहे तो सिलेक्ट करावा तसचे यासाठी जे network locations हवे असेल ते सिलेक्ट करावा.

पण आधि खात्री करा कि, याचे संभाव्य धोके तुम्ही जाणून आहात.


Windows Firewall with Advance Security:

विंडोज फायरवॉलच्या डाव्या बाजूला असलेला Advance Security या पर्यायाव्दारे तुम्ही Inbound, Outbound आणि connection security यांचे नियम configure करु शकता.


तुमचा अभिप्राय लिहा: