Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

ज्ञानधारित प्रश्न्

Disk Fragments म्‍हणजे काय? Disk Fragments कसे काम करते?

किरण पाटील | ऑगस्‍ट 24, 2014

जेव्हा तुमच्या लक्षात येते कि, तुमच्या कॉम्पयुटरचा वेग खुप कमी झालेला आहे, तेव्हा नक्कीच तुम्हाला हार्ड डिस्क defrag करावी लागते. पण तुम्हाला असा प्रश्न कधी पडला आहे का कि, defragments म्हणजे काय? आणि तुमच्या कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कची कामगिरीत कश्या प्रकारे सुधारणा करु शकता? या लेखात याविषयी चर्चा केलेली आहे.


Disk Fragmentation:

Disk defragmentation हि एक प्रक्रिया आहे ज्या व्दारे हार्ड डिस्कवरील fragmented data अधिक चांगल्या प्रकारे रचून दिला जातो, जेणे करुन ती अधिक कार्यक्षमतेने काम करेल. defragment म्हणजे काय हे जाणून घ्यायचे असेल तर आधी हार्ड डिस्क कश्या प्रकारे काम करते आणि त्यावर डाटा कश्या प्रकारे साठविला जातो हे जाणून घेणे अधिक आवश्यक आहे.


How Hard Disk Works:

हार्ड डिस्क मध्ये अनेक स्वतःभोवती फिरणारे प्लॅटर्स असतात, ज्यांना डाटा प्लॅटर्स असे म्हणतात. या प्लॅटर्सच्या प्रत्येक बाजूवर जाड समकेंद्री गोलाकार तळभाग असतो, त्यांना ट्रॅक असे म्हणतात. तसेच प्रत्येक ट्रॅक हा अनेक भागांमध्ये विभागलेला असतो, त्यांना सेक्टर्स असे म्हणतात. प्रत्येक सेक्टर हा निश्चित संखेचा डाटा साठवतो, जसे 512 बाईट. क्लस्टर हा डिस्क वरील अनेक सेक्टरने बनलेला एक गृप असतो आणि ते सेक्टर पेक्षा मोठे परिमाण असते.

जेव्हा तुम्ही हार्ड डिस्क वर डाटा साठवतात, तेव्हा हा डाटा सलगपणे एकाच विभागात साठवून ठेवला जातो. तांत्रीक भाषेत सांगावयाचे झाल्यास हा डाटा साठविण्यासाठी फाईल सिस्टिम योग्य प्रमाणात क्लस्टर वाटून देते. उदा. जर प्रत्येक क्लस्टर हा 512 बाइट साठवीत असेल तर 900 बाईट डेटा साठविण्यासाठी दोन क्लस्टरचे वाटप करते. नंतर जर तुम्ही हा डेटा अपडेट केला आणि त्याचा आकार 1600 बाईट झाला तर फाईल सिस्टीम आणखी दोन क्लस्टरचे वाटप करते.

हार्ड डिस्क मध्ये एक लहान हात (arm) असतो जो डिस्कवरील पृष्ठभागावर फिरू शकतो. जेव्हा तुम्ही वरील प्रकारे साठवीलेला डेटा ओपन करता तेव्हा या आर्मला या विषीष्ट सेक्टरवर यावे लागते आणि त्याच वेळी प्लॅटर सुध्दा स्वतःभोवती फिरते. नंतर मग या आर्मच्या सहाय्याने डेटा वाचला जातो आणि नंतर मग तो ओपन करुन दिला जाते. यालाच access time असे म्हणतात. जर तुम्हाला हा access time कमी करावयाचा असेल तर तुम्हाला यातील आर्मची हालचाल कमी हाईल याची दक्षता घ्यावी लागेल आणि यासाठी डिस्क वरील डेटा हा सलगपणे एकाच क्रमवारील साठवीला गेला पाहिजे.

आता कल्पना करा कि, जेव्हा तुमची हार्ड डिस्क अधिक डेटाने भरुन जाते, तेव्हा तुम्ही यातील काही फाईल डिलीट करता जेणे करुन इतर डेटा सेव्ह करता येईल. अश्या प्रकारे फाईल डिलीट केल्यावर या रिकाम्या जागा डिस्कच्या संपूर्ण पृष्ठभागावर पसरलेल्या असतात.

तसेच नंतर जेव्हा तुम्ही एखादे नविन अॅप्लीकेशन इन्स्टॉल करतात किंवा एखादी मोठी फार्इल सेव्ह करतात तेव्हा हा डाटा साठविण्यासाठी सलग लागून असलेली जागा उपलब्ध नसते आणि म्हणून हि मोठी फाईल किंवा अॅप्लीकेशन हे अनेक तुकडयांमध्ये अनेक ठिकाणी साठविले जाते.

आता जेव्हा असा डेटा ओपन केला जातो तेव्हा डिस्कवरील आर्मला या अनेक ठिकाणी फिरुन डेटा वाचावा लागतो. या प्रक्रियेला वेळ लागतो आणि परिणामी कॉम्प्युटरचा वेग कमी होतो.


Fragments:

वरील प्रकारे डिस्कवरील रिकाम्या जागा आणि मोठया प्रोग्रॅमचे किंवा फाईल्सचे अनेक तुकडे अनेक ठिकाणी साठवीण्यालाच fragments असे म्हणतात.

हार्ड डिस्कवर जोपर्यंत तुम्ही डेटा साठवतात, बदल करतात किंवा डिलीट करतात तोपर्यंत Fragmentation होतच असते.


How Disk Fragmentation works:

Disk Defragmenter हा एक टूल आहे जो डिस्कवरील डाटाची पुनर्रचना करतो आणि fragmented data ला पुन्हा एकत्र आणतो, जेणे करुन कॉम्प्युटर अधिक कार्यक्षमतेने काम करु शकेल.

Defragmenter हा हार्ड डिस्कमधील पार्टीशीयन मध्ये fragments शोधतो आणि डाटा एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी हलवतो जेणे करुन डाटा सलग लागून साठवीला जाईल. अश्या प्रकारे डेटा रचून झाल्यानंतर प्रोग्रॅम आणि डेटा अधिक कार्यक्षमतेने काम करतात कारण ऑपरेटींग सिस्टीमला डेटा आता अनेक ठिकाणांहून वाचावा लागत नाही.

Defragment करण्यासाठी दोन प्रकारेचे प्राग्रॅम आहे


1) Using the Windows Disk Defragmenter:

विंडोज ऑपरेटींग सोबत एक default disk defragmenter चा प्रोग्रॅम येतो.

विंडोज 7 मधील search box मध्ये Disk Defragmenter असे टाईप करुन Enter करावे.

चालू असलेले सर्व अॅप्लीकेशन आणि फाईल बंद कराव्यात.

Current status या पर्यायाखालील जे पार्टीशियन हवे असेल ते निवडावे.जर डिस्क defragmented आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी Analyze disk या बटनावर क्लिक करावे.

(एकदा विंडोज कडून डिस्कचे विश्लेष्ण पुर्ण झाले कि, तुम्ही डिस्क मधील fragmentation किती टक्के आहे हे तपासु शकता. जर हे 10 टक्के पेक्षा जास्त असेल तर मग मात्र तुम्हाला डिस्क defragment करुन घ्यावी लागेल)

Defragment disk या बटनावर क्लिक करावे.

Disk Defragmenter ची प्रक्रिया हि डाटाचा आणि fragmentation आकारानुसार काही मिनिटापासुन ते काही तासांपर्यंत चालू शकते.


2) Using Third Party application:

सर्वोत्तम मोफत Disk Defragmenter अॅप्लीकशेन विषयी अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.तुमचा अभिप्राय लिहा: