Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

ज्ञानधारित प्रश्न्

Windows Registry बददल तुम्‍हाला काय माहित असायला हवे?

किरण पाटील | 17 जुलै, 20014

विंडोज मधील Registry हा एक डाटाबेस आहे ज्‍यात सिस्टिम हार्डवेअर, इन्‍स्‍टॉल प्रोग्रॅम्‍स आणि सेटींग्‍ज, तुमच्‍या कॉम्‍प्‍युटरमधील प्रत्‍येक युझरची प्रोफाईल आणखी खुप काही माहिती साठविलेली असते. विंडोज या Registry मधील माहितीचा कायम संदर्भ घेत राहते.

Windows Registry कशासाठी वापरतात?

Windows Registry चा वापर विंडोज ऑपरेटींग सिस्टिममधील सर्व सेटींग्‍ज साठविण्‍यासाठी होतो. यात सॉफ्टवेअर आणि प्रोग्रॅम्‍स यांच्‍या सेटींग, ऑपरेटींग सिस्टिमची संरचना, हार्डवेअरची संरचना, युझर इंटरफेस, कंट्रोल पॅनल सेटींग आणि खुप काही.


Registry कशी तयार होते?

प्रोग्रॅम आणि अॅप्‍लीकेशन आपोआप Registry मध्‍ये आवश्‍यक ते बदल करतात. उदा. जेव्‍हा एखादा प्रोग्रॅम विंडोज मध्‍ये इनस्‍टॉल केला जातो, तेव्‍हा Windows Registry मध्‍ये काही subkey आपोआप टाकल्‍या जातात. यात या प्रोग्रॅमचे स्‍थळ, इतर काही सेटींग ज्‍या या प्रोग्रॅमचे समर्थन आणि असमर्थन करतात, हा प्रोग्रॅम कसा सुर होईल इ. माहिती असते. जर तुम्‍हाला या Registry मध्‍ये काही बदल करावयाचे असतील तर ते तुम्‍हाला स्‍वता करावे लागतील.


Registry त कसा प्रवेश मिळवावा?

तुम्‍ही Registry मध्‍ये बदल करण्‍यासाठी Registry Editor या प्रोग्रॅमची मदत घेऊ शकता, जो पुढील मार्गाने सुरु करता येतो -


Structure

Registry मधील डाटाबेस हा वृक्षच्‍या आकारात असतो. या वृक्षाच्‍या प्रत्‍येक फांदीला कि असे म्‍हणतात. प्रत्‍येक कि मध्‍ये त्‍यांची उप कि आणि डाटा एन्‍ट्रीज चे मुल्‍य असते. कि मध्‍ये कोणतीही संख्‍या कोणत्‍याही स्‍वरुपात असु शकते.

हा registry चा वृक्ष 512 पातळीपर्यंत खोल असु शकतो. तुम्‍ही एकाच वेळी 32 पातळयांपर्यंत एकाच registry API call करु शकता.


Registry मध्‍ये 5 root keys आहेत, त्‍यातील प्रत्‍येकात ठराविक registry बददल माहिती साठविलेली असते:


HKEY_CLASSES_ROOT - या कि मध्‍ये फाईलच्‍या नावाचे एक्‍सटेंशन आणि COM class registration बददलची माहिती जशी ProgIDs, CLSIDs, आणि IIDs साठविलेली असते. सोप्‍या भाषेत सांगायचे झाल्‍यास या कि मध्‍ये कोणतेही अॅप्‍लीकेशन सुरु करण्‍यासंबंधीची माहिती आणि काम करण्‍यासंबंधीच्‍या सुचना असतात.


HKEY_CURRENT_USER –  हि कि चालू युझर च्‍या सर्व सेटींग्‍ज स्‍थापित करण्‍यास मदत करते. या कि मध्‍ये विंडोज संरचनेसंबंधीची माहिती असते आणि युझर लाग इन झाल्‍यानंतर त्‍याच्‍या इतर सेटींग जसे environment variables, प्रोग्रॅम ग्रुपचा डाटा, डिस्‍प्‍ले सेटींग, डेस्‍कटॉप वॉलपेपर, प्रिंटर, नेटवर्क कनेक्‍शन आणि अॅप्‍लीकेशन प्रेफरंन्‍स, किबोर्ड आणि लेआऊट ई.


HKEY_LOCAL_MACHINE - यात इन्‍स्‍टॉल केलेले सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मिळून कॉम्‍प्‍युटरची निश्चित माहिती असते. यातील सबकिज मध्‍ये चालू डाटाची संरचना, प्‍लग आणि प्‍ले बददलची माहिती (यात सिस्टिमवर लावलेल्‍या सर्व हार्डवेअरची यादी असते), नेटवर्क लॉगऑन चा प्राधान्‍यक्रम, नेटवर्कच्‍या सुरक्षीतेची माहिती, सॉफ्टवेअर बददलची माहिती (जसे सर्व्‍हरचे नांव आणि त्‍याचा पत्‍ता), आणि इतर बरीच काही सिस्टिमची माहिती असते.


HKEY_USERS-            यात सध्‍या प्रत्‍येक अॅक्‍टीव्‍ह युझर्स चे ठराविक मांडणी साठविलेली असते. यात प्रोग्रॅमच्‍या सुचना, युझरच्‍या निवडलेली थिम, कलर्स, डेस्‍कटॉप आणि कंन्‍ट्रोल पॅनलची सेंटींग यासारखी माहिती युझरच्‍या प्रोफाईलमध्‍ये साठविलेली असते.


HKEY_CURRENT_CONFIG – यात सध्‍या असलेल्‍या कॉम्‍प्‍युटर सिस्टिम मधील हार्डवेअर प्रोफाईलची माहिती असते.


Backing Up Registry

Registry मध्‍ये काही बदल करण्‍यापुर्वी त्‍याचा बॅकअप घेणे गरजेचे आहे

यासाठी पुढील कृती करावी:

आता तुम्‍हाला येथे संपूर्ण registry चा बॅकअप झालेला दिसेल.


Restoring to the Registry from a Backup


Cleaning the Registry

जेव्‍हा कॉम्‍प्‍युटरचा कमी वेग, पुन्‍हा पुन्‍हा हँग होणे, कॉम्‍प्‍युटर सुरु होण्‍याला खुप वेळ लागणे या गोष्‍टी तुमच्‍या लक्षात येतील तेव्‍हा हि Registry clean करावी लागण्‍याची चिन्‍हे आहेत.

आपण वर बघीतलेच आहे कि, Registry मध्‍ये हजोरो नोंदी असतात, आणि प्रत्‍येक वेळी नविन नोंदी तयार होत असतात. येथे खुप माहितीचा साठा तयार झाल्‍यामुळे कॉम्‍प्‍युटरच्‍या वेगावर परिणाम होतो. अजुन एक समस्‍या आहे कि, जरी आपण एखादा प्रोग्रॅम अनइन्‍स्‍टॉल केला तरी यासंबंधी registry मध्‍ये असलेल्‍या सर्व नोंदी पुर्णपणे जात नाहित. कारण बरेचसे uninstallers हे registry मधील या नोंदी पुर्णपणे काढून टाकण्‍यास असमर्थ आहेत. यामुळेच आपल्‍याला registry clean करावी लागते. यासाठी अनेक प्रोग्रॅम्‍स आहेत, जे आपोआप registry clean करतात.

पण Registry clean करण्‍यासाठी बॅकअप घ्‍यायला विसरु नका.तुमचा अभिप्राय लिहा: