आयटी विषयी प्रश्‍नांचे समाधान

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

क‍ि बोर्ड चा वापर करुन माऊस पॉइंटर क्लिक व कंन्‍ट्रोल कसा करावा?

कल्‍पना करा कि, कॉम्‍प्‍युटर वर तुम्‍ही महत्‍वाचे काम करत आहात आणि अचानक कॉम्‍प्‍युटरचा माऊस ने काम करणे बंद केले तर? अश्‍या वेळी तुम्‍हाला या महत्‍वाच्‍या फाईल सेव्‍ह करुन बदं करण्‍यासाठी कि बोर्डचा वापर करावा लागेल आणि हे फार त्रासदायक ठरेल.

अश्‍या वेळेस पुढील उपाय तुमच्‍या उपयोगी पडेल. तुम्‍ही कि बोर्डवरील Numpad चा वापर करुन माऊस पॉइंटर फिरवू शकता तसेच क्लिक करु शकता.

तुम्‍ही कि बोर्ड वरील Left Alt+Left Shift+Num Lock किज प्रेस करुन Numpad चा माऊस म्‍हणून उपयोग करु शकता. या कि प्रेस केल्‍यानंतर Mouse Keys ची छोटी विंडो ओपन होईल, येथे Yes बटनावर क्लिक करावे.


किंवा पुढील मार्गाने जावे - Start button – Control panel – Ease of Access Center - Make the mouse easier to use या पर्यायावर क्लिक करावे.

Control the mouse with the keyboard या पर्यायातील Turn on Mouse Keys हा चेक बॉक्‍स सिलेक्‍ट करावा. नंतर Apply आणि Ok या बटनावर क्लिक करावे.

आता तुम्‍ही कि बोर्ड वरील numeric कि पॅड चा माऊस म्‍हणून उपयोग करु शकाल. यासाठी 8,2,4, आणि 6 या कि ने माऊस वर, खाली, उजवा आणि डाव्‍या बाजुला फिरेल. तसेच 7,9,1 आणि 3 या कि ने वरील उजव्‍या, डाव्‍या आणि खालील डाव्‍या, उजव्‍या बाजूला फिरेल. 5 या कि ने क्लिक करता येईल.

Note: या वैशिष्‍टयाचा वापर करीत असतांना Number lock कि ऑन असली पाहिजे.

कि बोर्ड वरील Numpad चा माऊस पॉइंटर म्‍हणून उपयोग बंद करण्‍यासाठी वरील मार्गाने जाऊन Turn on Mouse Keys हा सिलेक्‍ट केलेला पर्याय काढून टाकावा.

तुमचा अभिप्राय लिहा: