आयटी विषयी प्रश्‍नांचे समाधान

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

ऑफलाईन वाचण्यासाठी वेब पेजेस कसे सेव्ह करावे?

पण वेब पेजेस का म्हणून सेव्ह करावे,  जेणे करुन नंतर ते वाचता येईल? ठिक आहे,  तसे कारणे बरेच आहेत, जसे तुम्ही एखादी मजेशीर वेब साईट शोधून काढली आहे, पण ती तुम्हाला नंतर वाचायची आहे कारण तुम्ही तुमच्या कामात व्यस्त आहात, तुम्ही प्रवास करीत आहात, तर सतत ऑनलाईन असु शकत नाही कारण नेटवर्क प्रत्येक वेळेस उपलब्ध नसेल, एखादी उपयोगी माहिती जी तुम्हाला आपत्काळाता उपयोगी पडू शकते, सेव्ह करुन ठेवायची आहे. या सर्व परिस्थितीत आपल्यालया वेब पेजेस सेव्ह करुन ठेवावी लागतात. यासाठी पुढील पर्याय आहेत -


Brouser मधील Save As हा पर्याय वापरुन वेब पेजेस सेव्ह करणे

वेब पेजेस कॉम्प्युटरवर सेव्ह करुन ठेवणे हि एक पारंपारीक पध्दत आहे. येथे जे वेब सेव्ह करायचे आहे ते ब्राऊझर मघ्ये ओपन करुन नंतर फाईल मेनू मधील Save As मधील "Web Page, Complete&quot हा पर्याय वापरुन आपण हे वेब पेज कॉम्प्युटर मध्ये सेव्ह करुन ठेऊ शकतो. येथे या फोल्डर मध्ये HTML वेब पेज सोबत, त्या पेज मधील इमेज आणि डाटाच्या सर्व फाईल्स सेव्ह होतात. या HTML फाईल वर डबल क्लिक करुन आपण हे वेब पेज ऑफलाईन मध्ये बघू शकतो.


वेब पेज PDF मध्ये सेव्ह करणे.

नंतर वाचण्यासाठी आपण वेब पेजेसला PDF मध्ये सेव्ह करुन ठेऊ शकतो. यासाठी doPDF हे एक छोटेसे सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन घ्यावे. नंतर जे वेब पेज सेव्ह करायचे आहे, त्या वेब पेज वर print कमांड दयावी - प्रिंटरच्या लिस्ट मधून doPDF हा प्रिंटर सिलेक्ट करावा - नंतर जेथे हे वेब पेज सेव्ह करायचे आहे ते ठिकाण सिलेक्ट केलें कि हे वेब पेज PDF मध्ये सेव्ह होते. याविषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.


Pocket

Pocket हि एक मोफत सेवा आहे जी कोणतेही articles, videos किंवा इतर कोणतीही गोष्ट सेव्ह करते. तुम्ही काहीही तुमच्या ब्राऊझरवरुन किंवा वेब अॅप्लीकेशन वरुन किंवा Twitter, Flipboard, Pulse आणि Zite सारख्या अॅप्लीकेशनवरुन डाऊनलोड करु शकता. यासाठी तुमच्या कडे फक्त एक Pocket मध्ये अकाउंट उघडावे लागते आणि नंतर वेब वरुन तुम्ही काहीही डाऊनलोड करु शकता आणि जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा हे वेब पेजेस वाचू शकता. तसेच Pocket तुम्ही तुमच्या कडील मोबाईल किंवा टॅब्लेट वर देखील अॅक्सेस करु शकता आणि यासाठी इंटरनेटची जरुरी नाही. दुसरा पर्याय म्हणजे जे वेब पेज सेव्ह करावयाचे आहे त्याचा URL ई-मेल व्दारे प्राप्त करु शकता.

Pocket हे Android साठी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


Instapaper

Instapaper हा एक सर्वात सोपा उपाय आहे, इंटरनेटवरील articles ऑफलाईन वाचण्यासाठी सेव्ह करण्याचा आणि नंतर प्रवासात, केव्हाही, कोठेही iPhone, iPad, Android, computer किंवा Kindle वर वाचण्याचा.

यासाठी फक्त Instapaper bookmarklet हे तुमच्या बाऊझरच्या bookmark bar पर्यत ड्रॅग करावे, नंतर जेव्हा एखादे वेब पेज वाचण्यासारखे दिसेल पण वेळ नसेल तर bookmarklet वर क्लिक करा आणि नंतर आरामात वाचत बसा.

Instapaper हे bookmarklet पुरवितो ज्यात वेब पेजेस सेव्ह करुन नंतर वाचता येतात. येथे तुमच्या बाऊझर मध्ये सेव्ह केलेल्या लिंक दिसतात. Instapaper हे वापरण्यासाठी मोफत आहे तसेच त्यात ऑफलाईन वेब पेजेस वाचण्याची आणि सेव्ह केलेले URL हे RSS व्दारे पाठविण्याची सोय आहे.

तुमचा अभिप्राय लिहा: