आयटी विषयी प्रश्‍नांचे समाधान

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

विंडोज मध्‍ये फाइल मधील कन्‍टेन्‍ट कसे शोधाल? आणि तुम्‍हाला याची आवश्‍यक्‍ता का आहे?

किरण पाटील | मार्च 09, 2015


तुम्हाला विंडोज मध्ये फाइल्सचा शोध कसे घ्यावा हे माहित आहे; फक्त स्टार्टला क्लिक करा आणि सर्च मध्ये कीवर्ड टाइप करा. तसचे अनेक युझर्सला काही प्रॉप्रटीजवर आधिारित सर्च फिल्टर बदद्ल सुध्दा माहिती आहे.

ग्रेट! पण जर तुम्हाला विशिष्ट मजकूर किंवा वाक्यांश चा शोध सर्व फाइल्स मध्ये घ्यावयाचा असेल तर? विंडोज मध्ये अश्या पध्दतीने शोध घेता येता का?

होय, तुम्ही फाइलमधील कन्टेन्टचा शोध घेऊ शकता. तुम्ही वर्ल्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, एचटीएमएल, पीएचपी आणि इतर टेक्स्ट आधारित फाइल्स मध्ये मजकूराचा शोध घेऊ शकता.अनेकदा आपण महत्वाचा डेटा एखादया फाइलमध्ये सेव्ह करतो, पण कालांतने त्या फाइलचे नाव विसरतो. मग अश्या वेळेस अश्या पध्दतीने फाइल मधील मजकूराचा शोध घेणे खुप फायदेशीर ठरते.

येथे प्रथम विंडोज मधील अॅडव्हांस सर्च टूलची माहिती घेऊ आणि नंतर काही बेस्ट फ्री टूल पाहू या.


1) Using Windows Search:

बाय डिफॉल्ट विंडोज सर्च मध्ये फक्त फाइलच्या नावाने सर्च करता येते, परंतु याला तुम्ही सर्व फाइल मध्ये  त्यातील कन्टेन्ट चा सर्च करण्यासाठी कार्यान्वित करू शकता.


अश्या प्राकारे तुम्ही वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉइंट मधील कन्टेन्टचा सर्च करू शकता. पण जर तुम्हाला .html, .php, .js आणि इतर टेक्स्ट आधारित वेब आणि स्क्रिप्टिंग फाइल्स मधील कन्टेन्टचा शोध घ्यावयाचा असेल तर काही क्लिक करून हे करू शकता.


आता तुम्ही निवडलेल्या फाइल मधील कन्टेन्टचा शोध घेऊ शकता.2) Agent Ransack:

Agent Ransack हे एक फ्रीवेअर प्रोफेशनल फाइल-सर्च टूल आहे. यात अनेक पॅरॅमिटर आहेत, जे विंडोज सर्च युटिलिटी मध्ये नाहित. या प्रोग्रामचा इंटरफेस अतिशय साधा आणि सहजतेने समजण्यासारखा आहे, तसेच तो इन्फॉर्मेशन चा शोध अतिशय जलद गतिने आणि क्षमतेने घेतो.तुम्ही यात फाइल त्यांच्या नावाने किंवा त्यातील कन्टेन्ट ने शोध घेऊ शकता. तसेच फाइलचा आकार, फाइल कोणत्या तारखेच्या रेंज मध्ये मॉडीफाइड, क्रियेट किंवा शेवटी अॅक्सेस केली गेली आणि मॅच केस अश्या अनेक पॅरॅमिटरचा वापर करून शोध घेऊ शकता. याचा रिझल्ट तात्काळ एक पेन मध्ये मिळतो, तर दुस-या पेन मध्ये किती आयटम साठी सर्च केला गेला, किती आढळले आणि सर्चची लांबी याची आकडेवारी मिळते. तसेच हा टूल तुम्हाला तुमच्या सर्च टर्म फाइल मध्ये नेमक्या कोणत्या लाइन नंबरवर आहेत हे सुध्दा सांगतो.

डाउनलोड: Agent Ransack2) Instant Document Search:

Instant Document Search हा एक शक्तिशाली गूगल सारखा सर्च इंजिन आहे, जो तुमचे पीसी वरील डॉक्युमेंटसचा शोध घेतो. तुम्ही यात फाइल मधील विशिष्ट मजकूर किंवा किवर्ड चा शोध घेऊ शकता. Instant Document Search मध्ये सर्व लोकप्रिय डॉक्युमेंटस् चे प्रकार, लवचिक संरचनेचे पर्याय, सोयीस्कर युझर इंटरफेस आणि इतर उपयुक्त वैशिष्ट्ये आहेत. पण यात तुम्हाला झोन तयार करावा लागतो आणि सर्च करण्यासाठी लोकेशन येथे दयावे लागते, नंतर हा प्रोग्राम इंडेक्सींगची प्रक्रिया सुरू करतो जी खूप वेळ खाणारी आहे.


डाउनलोड: Instant Document Search3) ScanFS:

ScanFS हे सोप्या इंटरफेस सह अतिशय जलद फाइल लोकेटर आणि कॅटलॉग युटिलिटी आहे. हा प्रोग्राम रिअल टाइम सर्च तसेच डिस्क्कॅटलॉग तयार करण्यासाठी पर्याय पुरवतो, जो सर्व फाइलची माहिती डाटाबेस मध्ये स्टोअर करतो आणि त्याचा वापर ऑफलाइन सर्च मध्ये करतो.तुम्ही यात फाइलच्या नावाने किंवा कीवर्डचा वापर करुन शोध घेऊ शकता. हा प्रोग्राम अनेक सर्च फिल्टर ला सपोर्ट करतो ज्यात फाइलचे नाव, डिरेक्टरी, डेट आणि टाइम यांचा समावेश आहे. सर्च रिझल्ट हा फाइलच्या प्रिव्हू, मॅच झालेले किवर्ड हायलायटेड आणि इमेजेसचा थंबनेल प्रिव्हू  सह दिसतो.

डाउनलोड: ScanFSतुमचा अभिप्राय लिहा: