आयटी विषयी प्रश्‍नांचे समाधान

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

नको असलेले कॉल आल्‍यास कसे वागावे? आणि त्‍यांना कसे थांबवावे?े

किरण पाटील | सप्‍टेंबर 17, 2014

तुमचा फोन हा जगाशी संपर्कात राहण्यासाठी महत्वाची भुमीका करतो आणि तुमचे स्वातंत्र अबाधीत ठेवतो. पण काही वेळा, नको असलेले कॉल, पुन्हा पुन्हा येणारे कॉल किंवा विक्रेत्यांकडून आलेले कॉल हे समस्या निर्माण करतात. जर तुमची एखादी शांत सध्याकाळ किंवा डिनर मध्ये अश्या कॉलने व्यत्यय आणाला असेल तर तुम्ही एकटे नाही आहात.

येथे नको असलेले कॉल आले तर कसे वागावे आणि काय करावे याविषयी काही टिप्स दिलेल्या आहेत.


नको असलेल्या कॉल्सचे अनेक खुप प्रकार आहेत -


1) Unwanted sales or marketing calls:

नको असलेल्या कॉल्स मध्ये टेलिमार्केटिंग कडून आलेले कॉल सर्वात जास्त आहेत.

तुमच्या फोनच्या कॉलर आयडी वरुन आलेला कॉल हा टेलिमार्केटिंगकडील आहे हे तुम्ही जाणू शकता. अर्थातच तुम्ही लगेच हा कॉल बंद करु शकता. तुम्ही कामात खुप व्यस्त नसाल तर त्यांचे प्रारंभिक भाषण प्रथम ऐकून घ्या, पण वाईट शब्द प्रयोग करु नका कारण टेलीमार्केटर हा फक्त त्याचे काम करीत आहे. जर तुम्हाला त्यांच्या सर्व्हिसेस किंवा प्राडक्ट मध्ये रुची नसेल तर त्यांना सरळ "माफ करा, मला तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेवे मध्ये रस नाही" असे सांगा व लगेच फोन ठेवा. तसेच जर तुम्हाला भविष्यात त्यांच्याकडून कोणताही कॉल नको असेल तर तुमच्या नंबर त्यांच्या कॉलींग लिस्ट मधून काढून टाकण्यास सुध्दा सांगू शकता.


नको असलेल्या टेलीमार्केटींग कॉल पासुन सुटका करण्यासाठी सर्वात सोपी आणि परिणामकार पध्दत म्हणजे तुमचा आणि तुमच्या घरातील इतर नंबर Do Not Call Registry मध्ये नोंदवा.


2) Calls made to you by mistake i.e. Wrong number:

साधारणपणे चुकीचे क्रमांक हे तिरस्करणीय नसतात. काही वेळा नंबर डायल करतांना काही नंबरची देवाणघेवाण करतांना काही चुक होते आणि चुकीचा नंबर लागतो. तसेच जर 6 महिने कालावधीत नंबर अॅक्टीव्ह नसेल तर मोबाईल ऑपरेटर ते नंबर पुन्हा दुस-याला विकतात. अश्या वेळी सुध्दा या नंबरवर आधिच्या कॉनटॅक्ट लिस्ट मधील व्यक्ती कॉल करतात.

असे कॉल तुम्हाला आले तर हा चुकीचा नंबर असुन ज्या व्यक्तीशी त्यांना संपर्क साधायचा आहे ती व्यक्ती तुम्ही नाही आहात हे सांगावे. पण तुमचे नांव किंवा पत्ता त्यांना कधीही सांगु नका.


3) Annoyance calls:

त्रास देणारे कॉल हे जे कॉल्स हेतुपुर्वक तुम्हाला त्रास देण्यासाठी, गैरसोय किंवा तुम्हाला विनाकारण चिंतेत टाकण्यासाठी केलेले असतात. ते तुम्हाला विचलीत करु शकत असले तरी यासोबत काय करावे याचे काही मार्ग आहेत. जर तुम्हाला असे कॉल येत असतील तर त्यांचे नांव आणि ठिकाण शोधा. यासाठी TrueCaller सारख्या इतर अॅप्लीकेशनची तुम्ही मदत घेऊ शकता, तसेच इंटरनेटवर सुध्दा नंबर कोणत्या ठिकाणचा आणि कोणत्या ऑपरेटरचा आहे याची माहिती सहज मिळते. तसेच हे कॉल ब्लॉक करण्यासाठी कॉल ब्लॉकरचा सुध्दा उपयोग होऊ शकतो.


4) Spam Text:

Spam text मॅसेज मध्ये एखादे प्रॉडक्ट किंवा सेवेचा मजकूर असू शकतो तसेच तुम्ही 0000000$ रकमची लॉटरी जिंकली असुन तुमचे नांव, पत्ता व बँक अकाउंट नंबर मागीतला जातो. जोपर्यंत तुम्ही एखादया कंपनीला मॅसेज पाठवीण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत तुम्हाला असे मॅसेज पाठविणे हे बेकायदेशीर आहे.

जर तुम्हाला अनोखी नंबरवरुन असे मॅसेज येत असतील, तर त्यांना कधीही उत्तर देऊ नका. काही वेळा या मॅसेज मध्ये "text 'STOP' to be removed from the mailing list" असा संदेश टाकून तुमची माहिती मिळवीण्याची युक्ती वापरली जाते. याकडे सरळ दुर्लक्ष करा.


दुर्दैवाने असे मॅसेज थांबवीण्यासाठी कोणताही अधिकृत मार्ग नाही. पण तुम्ही पुढील काही सावधगिरीचे उपाय आहेत -


जर तुम्ही अॅण्ड्रॉईड मोबाईल युझर असाल तर “India Against Spam” हे अॅप्लीकेशन गुगल प्ले (https://play.google.com/store/apps/details?id=com.deepakj.smspam) वरुन डाऊनलोड करा. या अॅप्लीकेशनवरुन तुम्ही सरळ DND रजिस्टर करु शकता, स्पाम टेक्स्ट मॅसेज आणि नको असलेल्या कॉल विषयी TRAI कडे एका क्लिकने तक्रार करु शकता.


जर तुम्हाला असे नको असलेले कॉल किंवा मॅसेजचा अनुभव आलेला असेल तर त्याविषयीचा अनुभव येथे नक्की शेअर करा.
तुमचा अभिप्राय लिहा: