आयटी विषयी प्रश्‍नांचे समाधान

   Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

Wi-Fi चा पासवर्ड कसा परत मिळवावा

जर तुम्ही वाय-फाय चा admin पासवर्ड विसरलात तर वाय-फाय कनेक्ट करण्यासाठी लागणारी सिरियल कि बघणे अशक्य होते, आणि मग या वायरलेस नेटवर्क वर नविन कॉम्प्युटर कनेक्ट करणे शक्य होत नाही.

येथे यावर उपाय म्हणून पुढील पध्दती आहेत –

1. Windows 7 चा वापर करुन

जर तुम्ही विंडोज 7 वापरत असाल तर नेटवर्क सेक्युरीटी कि परत मिळविण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे या वायरलेस नेटवर्कला जोडलेले तुमचे विंडोज 7 ऑपरेटींग सिस्टम चे कॉम्पुटर

Steps:

Control Panel मध्ये जा - Network and Internet - Network and Sharing Center.

Manage wireless networks ला क्लिक करा

येथे कॉम्प्युटर ज्या वायरलेस नेटवर्कला जोडलेले असेल त्याचे नांव तसेच सेव्ह केलेला पासवर्ड किंवा सेक्युरीटी कि येथे दिसेल. यावर right click करुन Properties सिलेक्ट करावे.

Security tab वर क्लिक करावे.

By default हि सेक्युरीटी कि hide असते. Show characters बटनावर क्लिक करुन तुम्ही ती बघू शकता.


2. Default username आणि password चा वापर करुन

ब्राऊझर मध्ये router चा ip टाईप करा.

येथे डिफॉल्ट युझर नेम आणि पासवर्ड टाईप करावा. साधारणपणे username हे admin आणि पासवर्ड admin or 1234 or password हा असतो.

येथे Wireless tab शोधून पासवर्ड मध्ये जावे आणि तुम्हाला हा पासवर्ड येथे दिसेल.

किंवा encryption type शोधून येथे Encryption mode ला none सिलेक्ट करावे.

शेवटी सेटींग्ज सेव्ह करावी.


3. Reset the Router

जर वरील सर्व पर्याय उपलब्ध नसतील तर router reset करावा. साधारणपे router च्या मागील बाजूला एक लहान reset बटन असते, जे काही सेकंद प्रेस करुन router reset करता येते.


Use Wirelesskey View

WirelessKeyView हे वायरलेस नेटवर्क सेक्युरीटी कि किंवा पासवर्ड जो तुमच्या कॉम्प्युटरमध्ये स्टोअर केलेला असतो तो परत मिळवून देतो. यासाठी विंडोज xp मधील 'Wireless Zero Configuration' सर्व्हीस किंवा विंडोज 7, विंडोज vista, विंडोज सर्व्हर 2008 मध्ये 'WLAN AutoConfig' सर्व्हीस चा वापर करावा लागतो. Wirelesskey हे सर्व किज text/html/xml फॉरमॅट मध्ये सेव्ह करतो किंवा clipboard वर कॉपी करतो.

Wirelesskey हे येथुन डाऊनलोड करता येईल. http://www.nirsoft.net/utils/wireless_key.html,

http://www.nirsoft.net/utils/wireless_key.html


तुमचा अभिप्राय लिहा: