Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

मनोरंजक ट्रिक्‍स

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

कुल फेसबुक टिप्स आणि ट्रिक्स - तुमच्या मित्रांवर छाप पाडण्यांसाठी

किरण पाटील | जानेवारी 16, 2015

जर तुम्ही रोज किंवा अधूनमधून फेसबुक वापरत असाल, तर तुम्ही नक्कीच स्टेटस अपडेट करणे, फ्रेड्स अॅड करणे किंवा डिलीट करणे, चॅट करणे इ. विषयी परिचित असाल. पण या पोस्ट मधील टिप्सचा वापर करुन तुम्ही फेसबुक मध्ये काही मनोरंजक गोष्टी करु शकता.तुमच्या फेसबुक कमेंटसला अधिक रोमांचक करा:

सोशल नेटवर्क मधील सर्वात मोठी साइट फेसबुक मध्ये एक नवीन वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे कमेंट्स मधील स्टिकर्स. आता तुम्ही कमेंट्स मध्ये तुमची भावना अधिक मनोरंजकपणे आणि प्रभावीपणे व्यक्त करु शकता.

स्टिकर्स हा फेसबुक मधील कमेंट्स देण्यासाठी एक मोहक मार्ग आहे. फेसबुक मध्ये स्टिकर्स सोबत कमेंट्स लिहण्यासाठी तळाशी असलेल्या उजव्या बाजूच्या स्माइली फेसच्या चिन्हावर क्लिक करा आणि पाठविण्यासाठी एक स्टिकर निवडा.डिफॉल्ट पणे येथे फक्त पुशिन कॅट चे स्टिकर्स उपलब्ध आहेत, पण काळजी करु नाका कारण स्टिकर स्टोअर मध्ये हजारो इतर स्टिकर्स उपलब्ध आहेत. यासाठी प्लस आयकॉन (+) वर क्लिक करुन येथिल उपलबध पॅक पैकी जो इन्स्टॉल करायचा असेल त्यातील Free या बटनावर क्लिक करावे. आता या पॅक मधील सर्व स्टिकर हे स्टिकरच्या मुख्य विंडोमध्ये दिसतील.


अश्या पध्दतीने या नविन वैशिष्टयासह तुमचे कमेंट्स अधिक मनोरंजक करा आणि तुमच्या मित्रांवर छाप पाडा.


तुमचे किंवा इतरांचे प्रोफाइल पिच्चर चॅट मध्ये दर्शवा:

तुम्हाला माहित आहे का की तुम्ही तुमचे प्रोफाइल चित्र चॅट मध्ये दाखवू शकता? होय, तुम्ही चॅटींग विंडो मध्ये तुमचे किंवा इतर कोणाचेही प्रोफाइल चित्र दाखवू शकता. यासाठी तुम्हाला चॅट विंडो मध्ये युझर नेम किंवा युझर आयडी पूढील पध्दतीने लिहावा लागेल - [[प्रोफाइल-आयडी]] किंवा [[प्रोफाइल नाव]]वेगळया स्टाइलने तुमचे फेसबुक स्टेटस अपडेट करा:

तुम्ही तुमचे स्टेटस, कमेंट किंवा चॅट हे वेगळया स्टाइल मध्ये करु शकता. यासाठी खालील वेब साइटला भेट दया –

http://app.live-start.com/magic-status/

http://namefunk.com/

येथिल डायलॉग बॉक्स मध्ये इच्छित मजकूर टाइप करा आणि हवी ती स्टाइल निवडा. नंतर हे टेक्स्ट  कॉपी करुन हव्या त्या ठिकाणी पेस्ट करा.

तुमचा अभिप्राय लिहा: