Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

मनोरंजक ट्रिक्‍स

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

मजेशिर कि बोर्ड शॉर्टकटस ….. कमी माहित असलेली पण उपयुक्‍त

किरण पाटील | जुलै 23, 2014

आता वेळ आहे कि बोर्ड शार्टकटस चा वापर करुन काही वेळ गंमत करण्याची. कि बोर्ड शॉर्टकट हे कॉम्प्युटरवर काम करीत असतांना उत्पादत क्षमता वाढविण्याचे काम करतात. अर्थात, प्रत्येक कॉम्प्युटर युझरला आवश्यक असलेले कि बोर्ड शॉर्टकट माहित असलेच पाहिजे. कॉम्प्युटरवरील काम अधिक कार्यक्षमतेने आणि वेगाने करण्याव्यतीरीक्त, माऊसचा वापर न करता अनेक कामे करुन तुम्ही तुमचे मित्र किंवा सहका-यांवर छाप पाडू शकता.


Browser:

Ctrl+W: जर तुम्हाला वेब ब्राऊझर मधील टॅब बंद करावयाचा असेल तर या कि प्रेस कराव्यात. या किज चा उपयोग अनेक प्रोग्रॅम मध्ये सुध्दा होतो.

Ctrl+Shift+T: जर तुम्ही चुकून ब्राउझर मधील एखादा टॅब चुकून बंद केला असेल आणि तुम्हाला तो पुन्हा हवा असेल तर या कि प्रेस करा. (मॅक साठी Cmd+Z)

Ctrl+PageUp/PageDown: ब्राउझर मध्ये एका टॅब मधून दुस-या टॅबवर जलद गतीने जाण्यासाठी या कि वापराव्यात.


File and Folder:

Shift + CTRL + N: विंडोज 7 मध्ये एखादे फोल्डर तयार करणे खुप सोपे आहे. फक्त जेथे फोल्डर तयार करावयाचे आहे तेथे Shift + Ctrl + N या कि प्रेस कराव्यात. आता तुम्हाला New folder नावाचे एक फोल्डर तयार झालेले दिसेल.

F2: सिलेक्ट केलेल्या फाईल किंवा फोल्डरचे नाव जलद गतीने बदलवण्यासाठी F2 कि प्रेस करावी.

F3: हि कि प्रेस केली तर एक्सप्लोररची विंडो आणि त्यातील सर्च बार ओपन होईल. तर एक्सप्लोरर आधिच ओपन असेल तर यात फक्त सर्च बार ओपन होईल.

Alt+F4: चालू असलेला प्रोग्रॅम बंद होईल.

Ctrl+W: सध्या चालू असलेली विंडो किंवा टॅब बंद करण्यासाठी या किचा वापर करावा.


Magnifier

Windows + [+] OR Windows + [-] : स्क्रीन झूम इन किंवा झूम आऊट करण्यासाठी या कि ने विंडोज मॅग्नीफायर कार्यांन्वीत होतो.

Windows + Esc : मॅग्नीफायर मधून बाहेर पडण्यासाठी हि कि प्रेस करावी.


Amazing Windows key:

Windows + M: चालू असलेल्या सर्व विंडो ताबडतोब टाक्सबार वर मिनिमाईज केल्या जातात. अचानक आलेल्या ति-हाइत व्यक्तीपासुन तुम्ही करीत असलेले काम लपविण्यासाठी या कि चा वापर होऊ शकतो. जेव्हा तुम्हाला या सर्व विंडो परत हव्या असतील तेव्हा Windows + Shift + M कि प्रस करावी आणि तुमच्या समोर पुर्वी प्रमाणे सर्व विंडो आलेल्या दिसतील.

Windows + Home: सध्या चालू असलेला प्रोग्रॅम सोडून इतर सर्व विंडोज मिनिमाइज केल्या जातात.

Windows + L: कॉम्प्युटरला ताबडतोब लॉक केले जाते.

Windows + Tab: याला Aero Flip 3D असे म्हणतात. या कि चा वापर करुन तुम्ही जलद गतीने ओपन असलेल्या सर्व विंडोंचा प्रिव्हू दिसतो. येथे ओपन असलेल्या सर्व विंडोंचा ढिग दिसतो.

Windows + Pause: Systems Properties या डायलॉग बॉक्स जलद गतीने ओपन करण्यासाठी हि कि प्रेस करावी.

Windows + T: टास्क बार वरील एका प्रोग्रॅम मधून दुस-या प्रोग्रॅम मध्ये जाता येते.

Windows + Up/Down: चालू असलेली विंडो maximizes आणि restores करता येते.


तुमचा अभिप्राय लिहा: