Copyright © IT Vishwa. Site Design by Apex Computer                                                       Home | About US | Contact | Terms & Condition | Disclaimer                                            

मनोरंजक ट्रिक्‍स

आय टी विश्व

http://wwww.iteguru.com  |  http://wwww.itkhoj.com

       English Website                         हिन्दी वेबसाइट

Google मधील मजेशीर ट्रिक्‍स आणि गुपित

गुगल हे एक उत्‍तम आणि सर्वात जास्‍त वापरले जाणारे शक्‍तीशाली सर्च इंजीन आहे, पण यासोबतच अनेक मजेदार सर्च रिझल्‍ट आहेत, ज्‍याविषयी तुम्‍हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल.

येथे गुगल मधील उत्‍कृष्‍ट अश्‍या tricks, Easter eggs आणि secrets आहेत -

Google Sphere :

www.google.com वेब साईट ओपन करुन येथे Google Sphere टाईप करुन I’m feeling lucky” या पर्यायावर क्लिक करावे किंवा या लिंकवर क्लिक करावे..

येथे तुम्‍हाला दिसेल कि येथील सर्व गोष्‍टी स्क्रिनवर तरंगत आहेत. जेव्‍हा तुम्‍ही येथील सर्च मध्‍ये काही टाईप करुन सर्च केले तरी आलेला सर्च रिझल्‍ट तरंगू लागेल. Google sphere कि अतिशय गमतीची आणि मजेशिर ट्रिक आहे. या तरंगत्‍या गोष्‍टींभोवती माऊस पॉइंटर फिरवा आणि करमणूक करा.Google Gravity:

गुगल मध्‍ये जा आणि Google Gravity टाईप करुन “I’m feeling lucky” वर क्लिक करा किंवा या लींकला क्लिक करा..

येथे तुम्‍हाला दिसेल कि गुगल ने त्‍याचे गुरुत्व हरवले आहे आणि यातील सर्व गोष्‍टी खाली पडल्‍या आहेत. तुम्‍ही यातील सर्च बार टाईप करुन सर्च केलें तरी यातील सर्च रिझल्‍ट सुध्‍दा खाली पडतो. यातील कोणत्‍याही गोष्‍टीवर क्लिक करुन वर फेका आणि गंमत बघा.


Google Gravity Water:

गुगल मधील या आकर्षक परिणामात गुगल मधील सर्व गोष्‍टी पाण्‍याखाली पडतात. गुगल मध्‍ये Google Gravity टाईप करुन “I’m feeling lucky”या पर्यायावर क्लिक करावे किंवा या लिंकला क्लिक करा.

Google Gravity Underwater हा एक आश्चर्यकारक परिणाम आहे. यात सर्च रिझल्‍ट सुध्‍दा पाण्‍याखाली तरंगतात. टाईमपास करण्‍यासाठी यातील सर्व वस्‍तु क्लिक करुन वर फेकाव्‍यात किंवा पाण्‍यावर लाट तयार करण्‍यासाठी माऊस खालून वर ड्रॅग करावा.
Zerg Rush:

Zerg Rush हे एक Google easter egg आहे. गुगल मध्‍ये "ZERG RUSH" टाईप करुन कि बोर्ड वरील Enter कि प्रेस करावी आणि एक गेम खेळावा. यात तुम्‍हाला अनेक O चा समुह तुमचा सर्च रिझल्‍ट खातांना दिसेल. तुम्‍ही तुमचा सर्च रिझल्‍ट वाचविण्‍यासाठी या O वर क्लिक करुन त्‍यांना नष्‍ट करु शकता.


Make tilt Google:

गुगल मध्‍ये tilt टाईप करुन Enter कि प्रेस करावी. आता तुम्‍हाला तुमचे गुगल चे पेज खालच्‍या बाजूला झुकलेले दिसेल.

Spin Google

गुगल मध्‍ये do a barrel roll असे टाईप करुन Enter कि प्रेस करावी आणि तुम्‍हाला काही काळासाठी गुगल गरागरा फिरतांना दिसेल.

Draw a heart shape:

तुम्‍ही गुगलचा वापर आलेख काढण्‍यासाठी करु शकता. पुढील समीकरण कॉपी करुन गुगल मध्‍ये पेस्‍ट करा आणि तुम्‍हाला सर्च रिझल्‍ट मध्‍ये हृदयाच्‍या आकाराचे आलेख दिसेल. तुमचा मित्र किंवा मैत्रिणीवर छाप पाडण्‍यासाठी तुम्‍हाला याचा नक्‍कीच उपयोग होईल.

sqrt(cos(x))*cos(300x)+sqrt(abs(x))-0.7)*(4-x*x)^0.01, sqrt(6-x^2), -sqrt(6-x^2) from -4.5 to 4.5तुमचा अभिप्राय लिहा: